Dada Bhuse | त्या काळी मालेगाव जातीय दंगलीच्या आगीत होरपळत होते. मात्र, येथील लोकप्रतिनिधी वाडवडिलांच्या जीवावर मिळालेल्या सत्तेचा राजेशाही थाट उपभोगण्यात आणि आपली घरं भरण्यात मस्त होते. वाड्यात राहून दादा भूसेंनी मालेगावमधील परिस्थितीचे गांभीर्य जाणले आणि मालेगावात शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. जातीय दंगलींमुळे समाजाचे आणि लोकांचेच नुकसान होते. हे त्यांनी आपल्या सभांच्या माध्यमातून लोकांना पटवून दिले आणि त्यामुळेच हिंदुच नाही तर मुस्लीम समाजातही त्यांना मानणारा वर्ग मोठा आहे. दादा भुसे हे सुरुवातीपासून कधीही जातीयवादी नेत्यांपैकी नव्हतेच.
Dada Bhuse | अन् एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलाने प्रस्थापितांना घरी बसवले…
जाती, धर्माच्या नावावर मतं मिळवणं हे त्यांना कधीच पटलं नाही. शेतकरी कुटुंबातील असल्याने त्यांना मालेगावच्या शेतकऱ्यांच्या व्यथा माहीत होत्या. त्यामुळे त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत नेहमीच शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्रथम प्राधान्य दिले.कृषीमंत्री असतानाही त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक कामं केलीत. कृषी हिताचे अनेक निर्णय घेतले. बोगस खतविक्रीला पायबंद घातला, शेतकऱ्यांना लुटणाऱ्या बोगस कृषी सेवा केंद्रांचे लायसन्स रद्द केले, दादांनी व सर्व शिवसेना कुटुंबातील सदस्यांनी मिळून त्या काळी दहीदी येथे स्वखर्चातून अब्दुल कलाम बंधारा उभारला. गिरणा, मौसम नदीवर आणि इतर अनेक उपनद्यांवर केटीवेअर उभारले. संपूर्ण तालुक्यात शेकडो बंधारे बांधले आणि मालेगावकरांची तहान कायमची भागवली.
शेतकऱ्यांच्या आंदोलनांमध्ये त्यांच्या खांद्याला खांदा देऊन उभे राहिले, कांदा उत्पादकांच्या बाजूने भूमिका घेतली, शेतकऱ्यांच्या पाठी दादा नेहमी खंबीरपणे उभे राहिले आणि म्हणूनच कदाचित धर्मवीर आनंद दिघे हे तेव्हाच म्हंटले होते की,”जेव्हा शिवसेनेची सत्ता येईल तेव्हा कृषीमंत्री तूच असशील”. घराण्याकडे नाहीतर माणसाकडे बघून जनता त्याच्या मागे उभी राहते. मा. दादासाहेब भुसे यांनी खऱ्या अर्थाने मालेगावचे रूप पालटले.
Dada Bhuse | जागावाटप, मराठा आरक्षण, लाडकी बहीण योजनेबाबत दादा भूसेंचे स्पष्टीकरण
नुकतंच उद्घाटन झालेले मालेगावातील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महिला व बाल रुग्णालय हे राज्यातील पहिले अद्ययावत मॉड्युलर महिला रुग्णालय आहे. तर, काष्टी येथील छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान महाविद्यालय हेदेखील राज्यातील पहिले कृषी महाविद्यालय आहे. त्यामुळे जे राज्यात नाही ते माझ्या मालेगावात आहे. हे शब्द खऱ्या अर्थाने दादांनी खरे करून दाखवले आहेत. म्हणूनच आज मलेगावच्या महिला भगिनी म्हणतात की “आम्हाला दादांचा खूप मोठा आधार आहे.”, “जे कोणाला नाही जमलं ते आमच्या दादांनी करून दाखवलं”
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम