Dada Bhuse | सध्या राज्य विधिमंडळाचे पाच दिवशीय अधिवेशन सुरू असून, या अधिवेशनातून आता मोठी बातमी समोर आली असून, यानुसार शिंदे गटाच्या दोन नेत्यांमध्ये विधिमंडळाच्या लॉबीमध्येच राडा झाला आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यात धक्काबुक्की झाली आहे. तर, हा राजकीय राडा थेट विधीमंडळाच्या लॉबीमध्येच पाहायला मिळाला. दरम्यान, या दोघांमध्ये शंभुराज देसाई आणि भरत गोगावले यांनी मध्यस्थी केल्यानंतर हा वाद शांत झाला.
Dada Bhuse | नेमकं प्रकरण काय ?
तर, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सभागृहात आले होते. त्यावेळी शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते भरत गोगावले व इतर शिंदे गटाचे आमदार हेदेखील त्यांच्यासोबत होते. यानंतर मुख्यमंत्री सभागृहामध्ये गेले, त्यावेळी लॉबीमध्ये आमदार महेंद्र थोरवे व मंत्री दादा भुसे यांच्यात ही धक्काबुक्की झाली. दरम्यान, हा वाद नेमका का झाला हे समोर येऊ शकले नाही. मात्र शिंदे गटातील या दोन्ही आमदारांतील या वादामुळे पक्षांतर्गत धुसफूस बाहेर आली आहे. (Dada Bhuse)
Dada Bhuse | मंत्री भुसेंनी शब्द पाळला; वन हक्क समितीची आज बैठक
याप्रकारे अशा एकच पक्षांच्या दोन ज्येष्ठ नेत्यांमध्ये धक्काबुक्की होणं ही महायुती सरकारमधील मोठी घटना आहे. तर, यामुळे पक्षातील मतभेद आणि वाद हे चव्हाट्यावर आले आहेत. या वादात मंत्री शंभुराज देसाई आणि भरत गोगावले यांनी मध्यस्थी करून हा वाद थांबवला. सत्ताधारी पक्षणतील या वादाचा मात्र विरोधक पुरेपूर फायदा घेताना आणि यातून राजकीय हीत साधताना पाहायला मिळतील. भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिंदे गटाचे महानगरप्रमुख यांच्यात पोलिस ठाण्यात झालेल्या गोळीबारानंतर आता पुन्हा एकदा सत्ताधारी आमदारांमधील राडा झाला आहे.
राज्याचा कारभार ज्या विधीमंडळातून पार पडतो. तिथेच अशा प्रकारे जनतेचे दोन प्रतिनिधी त्यापैकी एक ज्येष्ठ मंत्री तर दुसरे मुख्यमंत्र्यांच्या पक्षातील आमदार हेच थेट विधीमंडळात भिडल्याने राज्याच्या राजकारणात नेमकं चाललंय काय? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. मात्र, यामुळे आता शिंदे गटाची अब्रू चव्हाट्यावर आली आहे. (Dada Bhuse)
Dada Bhuse | टवाळखोरांच्या धिंड काढा; पालकमंत्र्यांचे पोलिसांना कठोर निर्देष
चर्चा करताना फक्त आवाज वाढला
दरम्यान, या प्रकरणावर शंभूराज देसाई यांनी बाजू सावरताना म्हटले की,” येथे कोणताही राडा झालेला नाही. याचा काय पुरावा आहे?, मी माध्यमांना प्रश्न करतो की, लॉबीमध्ये माध्यमांचा कुठला कॅमेरा नाही. तरी तुम्ही असे कसे काहीही चालवता. एक मंत्री आणि एक आमदार हे केवळ चर्चा करत होते. आणि ही चर्चा करताना फक्त आवाज वाढला. यानंतर दोन्ही आमदारांना आम्ही लॉबीमध्ये घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली. कुठलाही वाद झाला नाही अन् कुणी भिडले नाही. बोलता बोलता मोठ्या आवाजात बोलले म्हणजे वाद झाला का?, असा उलट सवाल शंभुराज देसाईंनी माध्यमांना केला.(Dada Bhuse)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम