आजपासून तीन नव्या मार्गांवर सिटीलिंक बससेवा सुरु

0
2

नाशिक – नाशिककरांचा प्रवास सुख्खर व्हावा यासाठी नाशिक महानगरपालिकाने एक वर्षांपूर्वी सिटीलिंक बससेवा सुरु करण्यात आली.

सुरुवातीस काही मार्गांवर सुरु झालेली ही सेवा हळूहळू अनेक मार्गांवर धावू लागली. त्यातच आज सिटीलिंक प्रशासनाने वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करता तीन नवीन मार्गांवर सुरू करण्याबरोबरच काही महत्वाच्या मार्गांवरील बस फेर्‍यांत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही सेवा आजपासून सुरु झाली आहे.

वाढती प्रवासीसंख्या व प्रवाश्यांची मागणी बघता हे नवीन मार्ग व बस फेऱ्यांमध्ये वाढ केल्याचे त्यांनी सांगितले. तरी जास्तीत जास्त प्रवाश्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन सिटीलिंकच्या वतीने करण्यात आले आहे.

नवीन मार्गांवर सुरु केलेल्या व वाढ केलेल्या मार्गांवरील बससेवा :

१) मार्ग क्रमांक १३४ – नवीन सीबीएस ते निमाणी, अमृतधाम मार्गे कोणार्क नगर (संकलेचा सोसायटी) हा नवीन मार्ग सुरू करण्यात आला असून सदर मार्गावर सकाळी ६.१० वाजेपासून रात्री ८.४५ पर्यंत एकूण २० बस फेर्‍या सुटणार आहेत.

२) मार्ग क्रमांक १३५ – नवीन सीबीएस ते अमृतधाम, बिडी कामगार नगर मार्गे पार्कसाईट बिल्डींग हा देखील नवीन मार्ग सुरू करण्यात आला असुन सदर मार्गावर सकाळी ६.१० वाजेपासून संध्या. ७.५० पर्यंत एकूण १८ फेर्‍या सुटणार आहेत.

३) मार्ग क्रमांक १४७ – नवीन सीबीएस ते म्हसरूळ, वरवंडी, शिवनई आंबे मार्गे मोहाडी या नवीन मार्गावर २ बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या असून सकाळी ५.३० ते संध्या. ६.३५ वाजेपर्यंत एकूण १६ फेर्‍या या सोडण्यात येणार आहे.

४) मार्ग क्रमांक १२८ – निमाणी ते त्रिमूर्ति चौक, कामटवाडे मार्गे चुंचाळे गाव मार्गावर नवीन ४ बसेस वाढविण्यात आल्या असून यामुळे आता ह्या मार्गावर ८ बसेस असणार आहे. बसेस संख्या व पर्यायाने बस फेर्‍यांची संख्या वाढविण्यात आल्याने आता सदरील मार्गावर दर १५ मिनिटांना बस फेर्‍या उपलब्ध असणार आहे.

५) मार्ग क्रमांक २०१ – नाशिक रोड ते द्वारका, सिव्हिल, सातपुर, अशोक नगर मार्गे  बारदान फाटा मार्गावरील बस फेर्‍यांमध्ये वाढ करण्यात आली असून आता पूर्वीच्या अर्धा तासाऐवजी दर १५ मिनिटांना बस फेर्‍या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

६) मार्ग क्रमांक २०३ – नाशिक रोड ते सी.बी.एस, पवन नगर, उत्तमनगर मार्गे सिम्बोईसीस कॉलेज मार्गावरील बस फेर्‍यांमध्येदेखील वाढ करण्यात आली असून या मार्गावर देखील पूर्वीच्या अर्धा तासा ऐवजी आता दर १५ मिनिटांना बस फेर्‍या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here