कालिकामाता यात्रोत्सवातील रहाट पाळणेतून मनपाला १० लाखांचे उत्पन्न प्राप्त

0
2

नाशिक – शहराची ग्रामदैवत असलेल्या कालिकामाता यात्रोत्सवानिमित्त नाशिक महापालिका प्रशासनाकडून रहाट पाळणेसाठीच्या जागेचा लिलाव पार पाडण्यात आला. या लिलावातून महापालिकेला तब्बल १० लाख १७ हजाराचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. त्याचवेळी मात्र, दुचाकी वाहनतळाच्‍या लिलावाला बचतगटांचा प्रतिसाद मिळाला नसल्‍याचे समोर येत आहे. लवकरच प्रथम येणाऱ्यास प्राधान्‍य तत्त्वानुसार वाहनतळाच्‍या जागेचा लिलाव केला जाणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात येत आहे.

सलग दोन वर्षे कोविड महामारीमुळे सर्वच उत्सवांवर मर्यादा आल्‍या होत्‍या, त्यामुळे कालिका यात्रोत्‍सवदेखील झाला नव्‍हता. यंदा मात्र निर्बंध मुक्त झाल्याने गणेशोत्‍सव पाठोपाठ नवरात्रोत्‍सवाची जोरदार तयारी भाविकांमध्ये पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर मनपा प्रशासनातर्फे जुलैपासून कालिका यात्रोत्सवाची तयारी सुरु केली होती.

मुंबई नाका परिसरातील महापालिकेच्‍या मोकळ्या भूखंडावर दरवर्षी विविध रहाट पाळणे उभारले जातात. तसेच, खेळणी, खाद्यपदार्थांचे स्‍टॉलदेखील असतात. त्यासंदर्भात गेल्‍या २१ जुलैला रहाट पाळण्याच्‍या जागेकरिता लिलाव झाला होता, ज्यातून महापालिकेला तब्बल १० लाखांचे उत्पन्नही मिळाले आहे. परंतु, वाहनतळाच्या सात जागांच्‍या लिलावाला विविध बचतगटांकडून अद्यापही प्रतिसाद मिळालेला नाही.

दरवर्षी शहरातील विविध बचतगटांना दिल्‍या जाणाऱ्या वाहनतळाच्या जागेकरता गतवर्षीपेक्षा दहा टक्के अधिक वाढीनुसार साधारण एक वाहनतळ जागेच्‍या लिलावातून मनपाला यंदा सुमारे वीस हजार रुपये इतके उत्‍पन्न मिळू शकते. मात्र, सध्यातरी बचतगटांनी ह्या लिलाव प्रक्रियेकडे पाठ फिरविली आहे.

एकीकडे नवरात्रोत्‍सव सुरू होण्यास अवघे काही दिवस बाकी असताना मनपाने अजूनही वाहनतळाच्‍या जागेसाठी लिलाव प्रक्रिया सुरू असल्‍याचे सांगितले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here