Chandwad – Deola | महायुतीतील नेत्यांची अंतर्गत खदखद पाहता तसेच अजित दादांच्या राष्ट्रवादीच्या महायुतीतील समावेशानंतर राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीच्या तिन्ही पक्षांमध्ये नवचैतन्य आणण्यासाठी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याच्या चर्चा सुरू आहेत. तर, लोकसभा निवडणुकीतील कामगिरीवरही या नियुक्ती अवलंबून राहणार असल्याचीही चर्चा आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर अनेक आमदार इच्छुक असून, नाशिक जिल्ह्याही भाजपमधील तीन इच्छुक आमदार आहेत. डॉ राहुल आहेर, देवयानी फरांदे आणि सीमा हिरे या तिन्ही आमदारांची ही दुसरी टर्म असल्याने हे तिघेही मंत्रीपदासाठी इच्छुक आहेत. (Chandwad-Deola)
Chandwad-Deola | पण तेव्हा आ. आहेर यांची संधी हुकली
यापूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात आमदार डॉ. राहुल आहेर यांचे नाव चर्चेत होते. मात्र महायुतीत नव्याने दाखल झालेल्या अजित पवार गटाच्या नेत्यांना यात प्रधान्य देण्यात आल्याने थोड्यावरून देवयानी फरांदे आणि डॉ. राहुल आहेर यांची संधी हुकली होती. मात्र, आता विधानसभा निवडणुकीच्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार राहुल आहेर यांच्या मंत्रीपदाच्या स्वप्नाला नवचैतन्य प्राप्त झाले असून, त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्क सुरू केला आहे.(Chandwad-Deola)
मंत्रीपद आणि हॅटट्रिकसाठी ही शेवटची संधी..?
डॉ. राहुल आहेर हे चांदवड विधानसभा मतदारसंघातून ते सलग दुसऱ्यांदा निवडून आले असून, त्यांनी चांदवड-देवळा मतदार संघातून लोकसभेला महायुतीच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांनाही लीड मिळवून दिले होते. तसेच चांदवड-देवळा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आणि कांदा प्रश्नी भूमिका घेण्यात त्यांना अपयश आल्याने मतदारसंघात त्यांच्या हॅटट्रिकसाठी प्रतिकूल वातावरण आहे. त्यामुळे मतदारसंघातील एकूण परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ही त्यांची शेवटची संधी असू शकते.(Chandwad-Deola)
त्यामुळे डॉ. राहुल आहेर हे मंत्रीपदासाठी कमालीचे आग्रही आहेत. मात्र, याबाबत आमदार आहेर यांनी कमालीची गुप्तता बाळगली आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात नाशिकमधून भाजपच्या नाशिक मध्य विधानसभेच्या आमदार देवयानी फरांदे आणि चांदवड-देवळा मतदार संघाचे आमदार डॉ. राहुल आहेर यांची नावे समोर आली आहेत.
Chandwad – Deola | आहेर समर्थकांचे दावे फोल; चांदवड नाही फक्त देवळा तालुक्यातून ताईंना लीड
तरीही जिल्ह्यात भाजपचा मंत्री नाही
दुसरीकडे जिल्ह्यात भाजपचे पाच आमदार असून, भाजपची ताकद मोठी आहे. नाशिकमध्ये दोन मंत्री असून, एक राष्ट्रवादी अजित पवार गट आणि दुसरे शिवसेना शिंदे गटाकडे आहे. मात्र, भाजपची ताकद असूनही भाजपकडे मंत्रीपद नसल्याने जिल्ह्यातील भाजप नेत्यांमध्ये कमालीची चलबिचल पहायला मिळाली आहे. दरम्यान, या संदर्भात आता भाजपचे राजेतील नेते काय निर्णय घेणार हे पहावे लागणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम