Pankaja Munde | पंकजा मुंडेंच्या पुनर्वसनासाठी दिल्लीत हालचाली; भाजपने घेतला मोठा निर्णय..?

0
29
Vidhan Parishad Election
Vidhan Parishad Election

Pankaja Munde | या लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्रातील निकाल हा बहुतेक ठिकाणी अनपेक्षित होता. त्यात सर्वाधिक चर्चेत राहिला तो बीड लोकसभेचा निकाल. बीड लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे विजयी झाले. तर, भाजपच्या पांकजा मुंडे यांचा पराभव झाला. दरम्यान, पंकजा मुंडे(Pankaja Munde) यांचा पराभव झाल्यानंतर त्यांच्या ४ कार्यकर्त्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर येत असतानाच आता पंकजा मुंडे यांच्यासाठी दिल्लीत एक मोठा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

बीड लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागलेल्या भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना भाजप राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवण्याची शक्यता आहे. दिल्लीत नुकतीच भाजप (BJP) नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली असून, या बैठकीत हा निर्णय झाला असल्याची माहिती समोर आली आहे. तर यासाठी भाजपने हालचालीही सुरू केल्या आहेत.

Pankaja Munde | पंकजा मुंडेंच्या अडचणी संपेना..; आता काय आहे प्रकरण..?

Pankaja Munde | राज्यसभेवर पुनर्वसन झाल्यास… 

भाजपचे राज्यसभेचे खासदार पीयूष गोयल आणि उदयनराजे  भोसले हे लोकसभेवर निवडून आल्यामुळे या दोघांच्या राज्यसभेवरील जागा या रिक्त असून, यापैकी एका जागेवर पंकजा मुंडे (Pankaja Munde)यांना संधी मिळू शकते. दरम्यान, असे घडल्यास मागील विधानसभा आणि आता लोकसभा या दोन्ही निवडणुकीत पराभव झाल्याने पंकजा मुंडे आणि त्यांचे निराश आणि नाउमेद झालेल्या समर्थकांना दिलासा मिळणार आहे. सध्या राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद सुरू असून, बीड मध्ये या वादाची धग अजूनही कायम आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्लीतील भाजपच्या बैठकीत राज्यातील वरिष्ठ नेत्यांनी पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवण्याची मागणी केल्याची माहिती आहे.

Pankaja Munde |“तुम्ही माझी माणसं आहात की माझे शत्रू आहात?”,पंकजा मुंडे कार्यकर्त्यांवर भडकल्या.

पराभवाने पंकजा मुंडे यांचेही खच्चीकरण

या लोकसभा निवडणुकीत बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे(Pankaja Munde) आणि शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांच्यात लढत रंगली होती. तर, मुंडे यांच्याच बाजूने कौल असल्याचे एक्जिट पोलमध्येही सांगण्यात आले होते. मात्र, शेवटच्या फेरीपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या लढाईअंती बजरंग सोनवणे विजयी झाले. तर, पंकजा मुंडे यांच्या पराभवामुळे मुंडे समर्थकांना मोठा धक्का बसला आणि यातून काहींनी आत्महत्येसारखे पाऊलही उचलले. तर, स्वतः पंकजा मुंडे यांचेही खच्चीकरण झाले. दरम्यान, त्यामुळे आता पंकजा मुंडे यांचे राज्यसभेवर पुनर्वसन झाल्यास निराश मुंडे समर्थकांना दिलासा मिळेल.

४ मुंडे समर्थकांच्या आत्महत्या

पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा बीड लोकसभेतील पराभव हा अत्यंत अनपेक्षितच होता. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आणि त्यानंतर आता लोकसभा निवडणुकीतही पंकजा यांचा प्रभाव झाल्याने हा पराभव मुंडे समर्थकांच्या जिव्हारी लागला. पंकजा यांचे कार्यकर्ते प्रचंड निराश झाले असून,  याच नैराश्यातून बीड जिल्ह्यातील ४ मुंडे समर्थकांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊलही उचलले आहे. यानंतर पंकजा मुंडे यांनी या सर्वांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले आणि समर्थकांना आत्महत्या करु नका, असे आवाहनही केले.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here