Nashik Crime | नाशिक जिल्ह्यातील नांदगाव (Nandgaon) तालुक्यात पत्नीने प्रियकर, बहीण व मुलगा यांच्या मदतीने पतीची हत्या करत आपघाताचा बनाव केल्याची धक्कादायक समोर आली असून, या घटनेमुळे नांदगाव तालुका हादरला आहे. मात्र, नांदगाव पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आतच या घटनेचा तपास पूर्ण करत आरोपींना ताब्यात घेतले आहे. (Nashik Crime)
या घटनेत मुंबई मनपातील कर्मचारी दीपक गोण्या सोनवणे (वय ५४, रा. वाघोरे, ता. अमळनेर, जि. जळगाव) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून, संशयित आरोपी पत्नी पल्लवी दीपक सोनवणे, मेहुणी व मेहुणीचा मुलगा नितीन चंद्रकांत मोरे (रा. म्हसवे, ता. पारोळा) संदीप (रमेश) महादू लोखंडे (रा. शेजवळ, ता. मालेगाव), साईनाथ बाबुलाल सोनवणे, लखन बाबुलाल सोनवणे (रा. पिंप्री हवेली, ता. नांदगाव) या सर्वांनी संगनमताने मृत व्यक्तीची लाकडी दांडक्याने मारहाण करत आणि डोक्यात दगड घालून हत्या केली आहे. (Nashik News) तर, ही घटना नांदगावमधील जातेगाव (Jategaon) येथे घडली आहे.
Vasai Girl Murder | भर रस्त्यात प्रेयसीला संपवलं; नागरिक शुटिंग काढण्यात अन् गंमत बघण्यात व्यस्त
Nashik Crime | नेमकं प्रकरण काय..?
संशयित सहा जणांनी मिळून पतीच्या हत्येचा कट रचला. यानुसार, त्यांनी मृत दीपक यांना जातेगाव शिवारातील महादेव मंदिराजवळ बोलावले. या ठिकाणी आल्यानंतर त्यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली आणि डोक्यात दगड घालून त्यांची हत्या केली व दीपक यांची दुचाकी रस्त्याच्या कडेला ढकलून दिली आणि प्रेत झाडावर टाकून अपघाताचा बनाव आणण्याचा प्रयत्न करत सर्वांनी पोबारा केला होता.
मात्र, घटनास्थळी अपघात झालीचे दिसत असले तरी पोलिसांना याबाबत संशय निर्माण झाला आणि पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली. आधारकार्डच्या सहाय्याने मयताची ओळख पटवली आणि कुटुंबीयांच्या हालचालींवर लक्ष ठेवले. पुराव्यांच्या आधारे संशयितांची कसून चौकशी करण्यात आली आणि हत्येचा कत उघडकीस आला. या सहा जणांनी संगनमताने ही हत्या केली असून, यात पत्नीदेखील सहभागी असल्याचे तपासातून निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी या सहा जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करत आतापर्यंत चार आरोपींना ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरु आहे. (Nashik news)
Nashik Crime | नाशिकमध्ये नामांकित हॉस्पिटलच्या ICU मध्ये डॉक्टरवर हल्ला
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम