Chagan Bhujabal | युवक राष्ट्रवादीकडून मंत्री छगन भुजबळांचा वाढदिवस उत्साहात साजरा

0
24
#image_title

Chagan Bhujabal | राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्या निमित्त मुंबई प्रदेशाध्यक्ष समीर भुजबळ, दिलीप खैरे व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी क्रेनच्या सहाय्याने २५ फूट पुष्पहार व शाल, फेटा घालत ढोल ताशांच्या गजराने जंगी स्वागत करून शुभेच्छा दिल्या. यावेळी युवक राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी जमा केलेल्या ७७ डझन वह्यांचे वाटप मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते गरजू शालेय विद्यार्थ्यांना करण्यात आले.

Chagan Bhujabal | छगन भुजबळांचे भावनिक आवाहन; ही निवृत्तीची घोषणा की विधानसभेसाठी नवा डाव…?

छगन भुजबळ यांचा वाढदिवस भुजबळ फार्म येथे उत्साहात साजरा

मंत्री छगन भुजबळ यांनी आवाहन केल्याप्रमाणे, युवक राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ७७ डझन वह्यां घेऊन भुजबळांच्या हस्ते गरजू शालेय विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आल्या. भुजबळ यांचा वाढदिवस भुजबळ फार्म येथे पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतकांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. नाशिकच्या विकासासाठी दूरदृष्टी ठेवणारे मंत्री छगन भुजबळांची नाशिकच्या जनतेत विकासपुरुष अशी छबी असून नाशिक शहरासोबत जिल्ह्यातील इतरही विविध विकासाच्या प्रकल्पांना त्यांनी चालना दिली आहे. नाशिक फेस्टिव्हलच्या नियोजनात त्यांचा मोठा सहभाग राहिला आहे. राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे हे भुजबळ कुटुंबियांचे निकटवर्तीय असून मंत्री छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी जंगी तयारी करून ढोल ताशांच्या गजरात त्यांचा वाढदिवस साजरा केला.

Chagan Bhujabal | कांदे-भुजबळ वाद पुन्हा पेटणार….?; भुजबळांच्या पोस्टने भुवया उंचावल्या

पदाधिकाऱ्यांची कार्यक्रमास उपस्थिती

यावेळी ॲड. रविंद्र पगार, योगेश निसाळ, शशी हिरवे, मुकेश शेवाळे, अमोल नाईक, पवन रॉय, रामदास मेदगे, व्यंकटेश जाधव, संदिप गांगुर्डे, संदीप खैरे, डॉ. संदिप चव्हाण, संतोष भुजबळ, कुलदीप जेजुरकर, अजय बागुल, राहुल पाठक, रविंद्र शिंदे, भूषण गायकवाड, सुयोग मोरे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here