Budget 2024 Updates | मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प आज देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन या सादर करत असून, या अर्थसंकल्पात गरीब, महिला, शेतकरी, आणि युवकांवर विशेष लक्ष देण्यात आले असून, कृषी क्षेत्रासाठी १.५२ लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तर, 30 लाख तरुणांच्या रोजगारासाठीही प्रयत्न करण्यात आले असून, महिला रोजगारावर लक्ष देण्यात आले आहे. रोजगार आणि कौशल्य प्रशिक्षणासाठी 5 योजना जाहीर करण्यात आल्या असून, त्यासाठी 2 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर, महिला आणि मुलींना लाभ देणाऱ्या विविध योजनांसाठी 3 लाख कोटी देण्यात येणार आहे.
Budget 2024 Updates | तरुणांना महिन्याला ५ हजार रुपये
तरुणांना व्यवसाय क्षत्रात आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न करण्यात येणार असून, यासाठी नवीन व्यवसाय करण्यासाठी तरुणांना कर्ज देणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. तर, तरुणांच्या रोजगारावर विशेष भर 30 लाख तरुणांना रोजगार देणार. तर, 1 कोटी तरुणांना 500 टॉप कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी देण्यात येणार असून, या इंटर्नशिप करणाऱ्या तरुणांना 5000 रुपये महिन्याला आर्थिक मदत सरकारकडून करण्यात येणार. (Budget 2024 Updates)
Budget Session 2024 | अर्थसंकल्पात तरुणांसाठी ‘या’ योजनांची घोषणा होणार..?
अर्थसंकल्पात कोणत्या घोषणा
- पुढील 5 वर्षे मोफत रेशन व्यवस्था सुरू राहणार.
- कृषी क्षेत्रासाठी 1.52 लाख कोटी रुपयांची तरतूद
- रोजगारासाठी सरकारकडून 3 मोठ्या योजना राबवल्या जाणार
- बिहारमधील रस्त्यांसाठी २६ हजार कोटी
- नोकऱ्यांमध्ये महिलांना प्राधान्य
- 1 कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी प्रोत्साहन देणार
- 1 कोटी तरुणांना 500 टॉप कंपन्यांमध्ये इंटर्नशिप
- इंटर्नशिप करणाऱ्या तरुणांना महिन्याला ५ हजार (Budget 2024 Updates)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम