Breaking news : जयपूर-मुंबई एक्सप्रेस मध्ये गोळीबार ; चार जण ठार, या कारणातून केला गेला गोळीबार

0
19

Breaking news : जयपुर मुंबई एक्सप्रेस ट्रेन मध्ये गोळीबार झाल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास घडली आहे. पालघर जवळ चालत्या ट्रेनमध्ये ही घटना घडली असून यामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याचं समोर आल आहे. तर मृतांमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश असून एका पोलीस कॉन्स्टेबलनेच हा गोळीबार केल्याने खळबळ उडाली आहे.

https://thepointnow.in/deola-malegaon/

याबाबत मिळालेल्या अधिक माहिती नुसार, सोमवारी सकाळी जयपूरहून मुंबई मुंबईकडे जात असलेल्या पॅसेंजर रेल्वेमध्ये ही गोळीबार झाल्याची घटना घडली आहे.चेतन सिंह असं गोळीबार करणाऱ्या आरोपीचे नाव असून तो आरपीएफ चा जवान आहे. चेतन हा एस्कॉर्ट ड्युटीवर होता. यावेळी त्याने एएसआय टिका राम यांच्यावर गोळीबार केला. त्याने केलेल्या अंधाधुंद गोळीबारामध्ये टीका राम यांच्यासह तीन प्रवाशांचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

दरम्यान गोळीबार केल्यानंतर चेतन सिंह याने चेन पुलिंग करून रेल्वे थांबवली आणि तो दहिसर मध्ये उतरला आणि लगेचच त्याला आर पी एफ च्या पोलिसांकडून अटक करण्यात आली. त्याने हा गोळीबार का केला याची माहिती अजून समोर आली नसून त्याने मानसिक तणावा मधून गोळीबार केल्याचं बोललं जात आहे.

दरम्यानच्या रेल्वेच्या ज्या बोगीमध्ये ही घटना घडली ती बोगी पोलिसांकडून सील करण्यात आली असून या प्रकरणाचा पोलीस सर्व अंगांनी तपास करत आहेत. यात मृत्युमुखी पडलेल्या इतर तिघाही मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून त्यांच्यावर मुंबई येथील शताब्दी रुग्णालयामध्ये शवविच्छेदन करण्यात येत आहेत.

जयपुर हुन मुंबईकडे जाणारी ही पॅसेंजर रेल्वे होती या अचानक घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण रेल्वे सह स्थानक परिसरामध्ये एकच खळबळ उडाली मुंबई सेंट्रल स्थानकामध्ये रेल्वे मधील सर्व प्रवाशांना उतरवण्यात आलं असून रेल्वे सील करण्यात आली आहे तर घडलेल्या या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून बोगी मधील प्रवाशांची माहिती पोलिसांकडून घेण्यात येत आहे तर या प्रवाशांकडून जबाब देखील घेण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे .(mumbai)

दरम्यान फॉरेन्सिक टिम कडून या घटनेचा तपास केला जात आहे. याप्रकरणी तपासांती नेमकं काय समोर येणार? चेतन सिंह याने गोळीबार नेमकं कोणत्या कारणातून केला? (Jaipur-mumbai express) टीका राम आणि त्याच्यात काही वाद झाला का? त्याने मानसिक तणावातून हे कृत्य केलं का? अश्या अनेक प्रश्नांची उत्तरं तापसांती समोर येणार आहेत.

गोळीबाराचं कारण काय?

आरपीएफ हवालदार चेतन सिंहचा ट्रेनच्या डब्यातील काही प्रवाशांसोबत वाद झाला होता. यावेळी संतापलेल्या चेतन सिंहने प्रवाशांचे दिशेने बंदूक उगारली. मात्र सहकाऱ्याने त्याला थांबवण्याचा आणि शांत राहण्यास सांगितलं. परंतु रागात असलेला चेतन सिंह कोणालाही जुमानला नाही. त्याला थांबवणाऱ्या आरपीएफच्या कर्मचाऱ्यासह तीन प्रवाशांवर त्याने गोळीबार केला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.(firing in train)

दरम्यान वापीहून बोरीवली, मीरा रोड स्टेशनदरम्यान गोळीबाराची घटना घडली. यानंतर जीआरपीच्या जवानांनी गोळीबार करणाऱ्या आरपीएफ कॉन्स्टेबलला ताब्यात घेऊन बोरीवलीला आणलं आहे. तर चार जणांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here