Skip to content

Satana riots : इथले राजकारण काही संपेना ; गावाची नासधूस मात्र राजकारणी आरोप-प्रत्यारोपात व्यस्त


Satana riots ;  सटाण्यात झालेल्या दगडफेकी प्रकरणात आजी-माजी आमदारांचे आरोप प्रत्यारोप सुरू झाल्याने या दंगल प्रकरणाला आता राजकीय वळण प्राप्त झालं आहे.

शनिवार २९ जुलै रोजी सटाणा शहरामध्ये मणिपूर घटनेच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या मोर्चाला लागलेले हिंसक वळण लाभलं आणि त्यात गावाच अतोनात नुकसान देखील झालं. ज्या मध्ये अनेक गाड्यांच्या काचा फुटल्या,अनेक फेरीवाल्यांचे मालाचे झालेले नुकसान ,अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले,परिवहन महामंडळाच्या गाड्यांच्या काचा फुटल्या,खाजगी वाहनांची तोडफोड केली गेली,अनेक व्यावसायिकांच्या दुकानांचे नुकसान मोठ्या प्रमाणात आहे याहून गंभीर बाब म्हणजे सटाणा बस स्थानकाजवळ एका गरोदर महिलेच्या पोटावर लाथ मारली गेली.

मणिपूर घटनेमध्ये एका महिलेला विवस्त्र करून मारहाण करून धिंड काढण्यात आली या घटनेचे कोणीच समर्थन करू शकत नाही परंतु एका महिलेला न्याय मिळावा म्हणून सटाण्यात मोर्चा काढण्यात येतो आणि या मोर्चा मध्ये एका गरोदर महिलेच्या पोटावर लाथ मारली जाते तीही यशवंतराव महाराज यांच्या पुण्यनगरीत याला कुठला न्याय म्हणावा?
दुसरीकडे ही सर्व घटना घडून गेल्यानंतर पोलीस प्रशासन पुरावे जमा करण्यात व्यस्त आहेत आणि बागलाण चे आजी माजी आमदार एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात व्यस्त आहेत.

https://thepointnow.in/breaking-news-firing-in-jaipur-mumbai-express/

या घटनेमध्ये झालेले नुकसान हे खूप मोठ्या प्रमाणावर असून आणि झालेली घटनाही निंदनीय असून हे सिद्ध करण्यासाठी आजी-माजी आमदारांनी प्रयत्नशील हवे असताना परंतु या घटनेमध्ये आजी-माजी आमदार दोघे एकमेकांवर आरोप करण्यात धन्यता मानत आहेत, आणि आपल्या झोळीत आदिवासींचे मतदान कसे पाडता येईल या प्रयत्नात आहेत आणि यासाठी या झालेल्या प्रकरणात पोलिसांनी हस्तगत केलेल्या आरोपींना कसे मोकाट सोडता येईल आणि आपली राजकीय पोळी कशी भाजली जाईल या प्रयत्नात हे आजी-माजी आमदार आहेत.

माजी आमदार दीपिका चव्हाण म्हणाल्या की, शनिवारी झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले याला सर्वस्वी विद्यमान आमदार दिलीप बोरसे हेच जबाबदार आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात निघणाऱ्या मोर्चाला सामोरे जाण्यासाठी विद्यमान आमदार यांनी उपस्थित राहणे गरजेचे होते. परंतु, विद्यमान आमदार बोरसे हे जाणून बुजून आंदोलन ठिकाणी गैरहजर राहिले बोरसे हे आंदोलन ठिकाणी उपस्थित न राहिल्यामुळे आदिवासी बांधवांनी आमदार आंदोलन स्थळी येई पर्यंत आंदोलन चालू राहील असे अडून बसले परंतु बोरसे उपस्थित न झाल्यामुळे आंदोलकांचा संयम सुटला आणि शांततेत पार पडत असलेल्या या आंदोलनाला हिंसक वळण लागले. घडलेल्या या अनुचित प्रकाराला सर्वस्वी विद्यमान आमदार दिलीप बोरसे हेच जबाबदार असून त्यांनी सकल आदिवासी समाजाची माफी मागून या प्रकरणात जे काही आदिवासी नागरिक या प्रकरणात ओढले गेले किंवा दगडफेकीमध्ये पोलिसांच्या कारवाईमध्ये पकडले गेले त्यांना निर्दोष मुक्त करण्यासाठी प्रयत्न करावेत, आणि आदिवासी बांधवांचा फक्त मतदानासाठी उपयोग न करता त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणे हे विद्यमान आमदारांचे आद्य कर्तव्य आहे.

माजी आमदार दीपिका चव्हाणांच्या आरोपांना आमदार दिलीप बोरसे यांचे प्रत्युत्तर

गोरगरीब आदिवासींच्या खांद्यावर बंदूक ठेवून हल्लेखोरांना चितावणी देणार कोण? हे दीपिका चव्हाण यांनी आपल्या पतीला विचारावे आणि दोन समाजात तेढ निर्माण करणारे संजय चव्हाण हेच या घटनेला जबाबदार असून त्यांची पोलिसांनी सखोल चौकशी करून संजय चव्हाण यांना अटक करावी. अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे बोरसे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच दीपिका चव्हाण यांचे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा, गरीब आदिवासींना भडकावून दंगा घडवून आणण्याचे पाप संजय चव्हाण यांनीच केले असून त्यांना आदिवासी समाज कधीच माफ करणार नाही आणि या घटनेची पोलिसांनी सखोल चौकशी केल्यास या दंगली मागचे झारीतील शुक्राचार्य कोण? हे जनतेसमोर येईल. गरीब आदिवासींचा बोगस आदिवासी म्हणून संजय चव्हाण यांना व्यासपीठावरून हाकलून लावल्याचा राग मनात धरून ही दंगल पेटविल्याचा गंभीर आरोप दिलीप बोरसे यांनी केला आहे.

दरम्यान याची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्याकडे करणार असल्याचे सांगितले.
दिलीप बोरसे यांनी दीपिका चव्हाण यांना उत्तर देऊन एक प्रकारे संजय चव्हाण यांच्यावर पलटवार केला आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!