देवळा मालेगांव रस्त्यावर खारीफाट्यावर दुकानात चोरी


देवळा : देवळा मालेगांव रस्त्यावर खारीफाटा येथे शनिवारी दि २९ रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी ३ ते ४ दुकाने टामी च्या साह्याने पत्रे तोडून दुकानातील जवळपास ४० हजार रुपयांची रक्कम लंपास केल्याची घटना घडली असून याबाबत देवळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देवळा /देवळा मालेगांव रस्त्यावर खारीफाटा येथे अज्ञात चोरट्यांनी फोडलेली दुकाने (छाया – सोमनाथ जगताप)

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देवळा मालेगांव रस्त्यावरील खारी फाट्यावर रोशन शिरसाठ यांच्या शेतकरी अमृततुल्य व आडत दुकानाच्या गल्यातून २० हजार ,तर अमोल सोनवणे यांच्या गुरूकृपा टँक्टर गँरेज मधून ५ हजार तर किरण सोनजे यांच्या कृषीे स्वराज्य दुकानातून १२ ते १४ हजार तर काही साहीत्य चोरीस गेले आहे. रात्री दहा वाजता दुकान बंद करून घरी गेल्यानंतर रविवारी सकाळी ह्या चोरीच्या प्रकरणाची घटना उघडकीस आली .

दरम्यान ,चोरट्यांनी त्यांच्या दुकानाचे पत्रे तोडून आत घुसून ३५ ते ४० हजार रुपयांची रोकड लंपास केली आहे . या परीसरात ८ दिवसांपूर्वी देखील चोरी झाली असुन , गुन्हेगारांवर कुणाचाच वचक राहीला नसून सर्रासपणे दुकाने फोडली जात आहेत .चोरटे दुकानातील रोकड घेऊन चोरटे पोबारा करत आहेत. यामुळे परिसरातील छोट्या छोट्या व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे .

देवळा पोलिसांनी ह्या घटनेकडे कटक्षाने लक्ष देउन रात्रीची गस्त वाढवावी व चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी परीसरातून होत आहे. याबाबत अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक दिलीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विक्रांत कचरे आदी करीत आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Leave a Comment

Don`t copy text!