
देवळा ; मणिपूर राज्यात महिलांवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना तात्काळ फाशी द्यावी ,या मागणीसाठी वायबीएस संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रघू नवरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील ,पोलीस उपनिरीक्षक विक्रांत कचरे यांना निवेदन दिले .

मणिपुरात दोन तीन महिन्यापासून सुरू असलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर सरकारचा नाकेतर्पणा तसेच या दंगलीच्या बळी ठरलेल्या दोन महिलांची नग्न करून धिंड काढून त्यांच्यावर अत्याचार केल्याच्या निषेधार्थ वायबीएस संघटनेने त्या महिलांवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करून फाशी द्यावी, तसेच सरकार कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरलेले मणिपुरमधील भाजप सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी ,अशी मागणी करण्यात आली.
निवेदन देण्याप्रसंगी वायबीएस संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रघू नवरे , दादाजी जाधव ,अंबादास आहिरे, प्रकाश जाधव ,भाऊसाहेब जाधव ,छोटू कुवर शरद गायकवाड, राजू वाघ ,पोपट जाधव ,बापू तलवारे, बाळासाहेब मोरे बाळू पवार, समाधान सोनवणे पवन ठाकरे, अजय कुवर आदी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम