Shrikant Shinde | मुख्यमंत्र्यांच्या मुलावर भाजप आमदार नाराज

0
27
Shrikant Shinde
Shrikant Shinde

Shrikant Shinde |  कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार हे मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) आहेत. दरम्यान, कल्याणमध्ये महायुतीचे काही आमदार हे श्रीकांत शिंदेंवर नाराज असल्याची चर्चा मध्यंतरी होती. हे वाद मिटवण्यासाठी काही ज्येष्ठ नेत्यांनी युद्धपातळीवर प्रयत्न केले. मात्र, ते सपशेल अयशस्वी ठरल्याचे दिसत आहे.

याचे कारण म्हणजे आज कल्याणचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी मध्यमांसमोर खासदार श्रीकांत शिंदे यांच्याबद्दलची खदखद बोलून दाखवली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, कल्याण लोकसभा मतदार संघाचा उमेदवार कोण असेल हा निर्णय भाजपचेच पक्षश्रेष्ठी घेतील”, त्यांच्या या वक्तव्यामुळे आता महायुतीतही मतभेद आहेत का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. (Shrikant Shinde)

तसेच पुढे आमदार गणपत गायकवाड म्हणाले की, “आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचाच उमेदवार निवडून येईल. कल्याण मतदार संघाचा उमेदवार हा भाजपचा असेल की, खासदार श्रीकांत शिंदे हेच असतील ते भाजपचे पक्षश्रेष्ठ ठरवतील. मात्र, पक्ष ज्याला कोणाला तिकीट देईल, मान्यता देईल, त्याचंच काम आम्ही करू. इतर कोणीही येऊन कितीही ताकद लावली. तरी कल्याणमध्ये भाजपशिवाय दुसरा उमेदवार निवडून येऊच शकत नाही. श्रीकांत शिंदे हे जिथे उभे राहतील ते तिकडून निवडून येतील. मात्र, या मतदारसंघात तिकीट कोणाला द्यायचं हे आमचे जेष्ठ नेते ठरवतील. त्यावेळेला जो उमेदवार असेल त्याला आम्ही निवडून आणू”, असं मोठं वक्तव्य आ. गणपत गायकवाड यांनी केलं आहे.(Shrikant Shinde)

Lok Sabha 2024 | संजय राऊतांमुळे काँग्रेसचा बडा नेता शिंदे गटात

Shrikant Shinde | कल्याण लोकसभा भाजपचीच

“कल्याण लोकसभा मतदार संघ हा भाजपचा बालेकिल्ला होता. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले. तेव्हा त्यांनी आम्हाला मोठी ताकद दिली. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यामुळे आता आमचा बालेकिल्ला आणखी पुन्हा मजबूत झाला आहे. त्यामुळे आता येथे जो उमेदवार असेल तो शंभर टक्के निवडून येईल आणि तो आमचाच असेल. यांच्याकडे उमेदवार नाही म्हणून हे आता पुढे जाऊ शकत नाहीत”, अशी टीका आ. गणपत गायकवाड यांनी केली.(Shrikant Shinde)

“मी आता तीन वेळा आमदार होऊन शिकत पुढे आलो आहे. मला खासदारकीची कुठलीही इच्छा नाही. मी खासदार झालो तर पुन्हा मतदारसंघ मागे येईल, कारण, मला पुन्हा खासदारकीचा अभ्यास करावा लागेल. त्यामुळे मला खासदारकीची इच्छा नाही तसेच मी त्या रेसमध्येही नाही”, असंही यावेळी आमदार गणपत गायकवाड यांनी स्पष्ट केलं.

CM Eknath Shinde | ….मग श्रीकांत शिंदे तुमचा मुलगा नाही हे सिद्ध करा

काम करून आमचं नाव नाही… 

“खासदार श्रीकांत शिंदेंबद्दल स्थानिक आमदारांमध्ये नक्कीच नाराजी आहे. आमचा अधिकार हा राज्य शासनाच्या निधीत प्रत्येक ठिकाणी आहे. मतदार संघातील विकासकामांच्या उद्घाटनांच्या ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून, आमदार म्हणून आमचं त्या बोर्डवर नावच नसतं”. असही नाराजी त्यांनी बोलून दाखवली.(Shrikant Shinde)

दरम्यान, ते पुढे म्हणाले की, “मतदार संघातील काही ग्रामीण भागातील योजना, तसेच राज्य सरकारचे काही विशेष निधी, हे लोकार्पण सरकारी अधिकाऱ्यांच्या हस्ते नाहितर शिंदे गटाच्या लोकप्रतिनिधींच्या हस्ते होतात”, अशी खंतही यावेळी गणपत गायकवाड यांनी व्यक्त केली.

“तसेच, स्थानिक नेत्यांना डावलून त्यांनी उद्घाटन करणं हे चुकीचं आहे. त्यांनी उद्घाटन केलं मात्र, त्या कामांमध्ये स्थानिक आमदारांचाही काही वाटा असतो. आमचं नाव येत नाही यामुळे आम्हाला नाराजी वाटणे साहजिक आहे. आणि जोपर्यंत या बाबींमध्ये सुधारणा होत नाही. तोपर्यंत ही नाराजी राहणारच”, अशी स्पष्ट भूमिका गणपत गायकवाड यांनी मांडली आहे. (Shrikant Shinde)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here