BJP | काय सांगता..! चोरांनी भाजप अध्यक्षांचीच फॉर्च्युनर कार चोरली

0
45
Rajyasabha Candidate
BJP

BJP | एकीकडे आगामी लोकसभा देशात निवडणुकींची धूम सुरू आहे. तर, दुसरीकडे सद्यस्थितीला देशातील सर्वात मोठा रजकीय पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षांच्या बाबतीत एक मोठी बातमी समोर आली आहे. यानुसार भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे.पी नड्डा यांच्या पत्नीची फॉर्च्युनर कार चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. या कारची सर्विसिंग करण्यासाठी त्यांचा चालक हा दिल्लीतील गोविंदपुरी याठिकाणी कार घेऊन गेला होता. दरम्यान, १९ मार्च रोजी या सर्व्हिस सेंटरमधूनच नड्डा यांची फॉर्च्युनर कार चोरी झाली. त्यामुळे जे.पी नड्डा यांच्या चालकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पोलिस कारचा शोध घेत आहेत. दरम्यान, भाजप अध्यक्षांच्याच पत्नीची कार चोरीला गेल्याने दिल्लीत खळबळ उडाली आहे. (BJP)

निवडणुकींमुळे अनेक नेते चर्चेत आहेत. मात्र, भाजपचे अध्यक्ष हे त्यांची फॉरच्युनर कार चोरीला गेल्यामुळे चर्चेत आले आहेत. दिल्लीत वाहन चोरीच्या या गेल्या काही दिवसांत वाढल्या असून, एखाद्या सामान्य व्यक्तीची वाहन चोरीला गेल्याच्या घटनेकडे इतके लक्षही दिले जात नाही. मात्र, देशातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षाच्या अध्यक्षांच्याच पत्नीची कार चोरीला गेल्याने हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. (BJP)

BJP loksabha Candidate | भाजपाची दुसरी यादी जाहीर; भारती पवार आणि सुभाष भामरे यांनाच पुन्हा उमेदवारी

 या तीन दिवशी वाहनांची विशेष काळजी घ्या 

राजधानी दिल्लीत दर १४ मिनिटांनी एक वाहन चोरीला जाण्याची घटना घडत आहे. गेल्या वर्षी रोज सरासरी १०५ वाहन चोरीच्या प्रकरणांची नोंद झाली आहे. तर, सर्वाधिक वाहन चोरीच्या घटना या मंगळवार, रविवार व गुरुवार या तीन  दिवसांत घडल्याचे देखील याद्वारे समोर आले आहे. त्यामुळे दिल्लीच्या नागरिकांनी या तीन दिवशी आपल्या वाहनांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. तर, देशाच्या राजधानीतच इतक्या चोरीच्या घटना घडत असल्यामुळे दिल्लीच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा विषय एरणीवर आला आहे. (BJP)

BJP Lok Sabha | भाजपची रणनीती ठरली; कोणत्या जागेवर कोणता उमेदवार..?

BJP | यासाठी गाडीत जीपीएस लावा… 

देशातील अंके मोठ्या शहरांमध्ये वाहन चोरीच्या घटना या अनेकपटींनी वाढल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, आपले वाहन चोरीला गेल्यास ते तात्काळ परत मिळवण्यासाठी नागरिकांनी आपल्या गाडीत जीपीएस लावण्याचे आवाहन पोलिसांकडून केले जात आहे. कारण जर आपल्या गाडीत जीपीएस असेल, तर गाडी चोरीला गेल्यानंतरही ती गाडी कुठे आहे? याची लगेच माहिती पोलिसांना मिळू शकते. मात्र, गाडीत जीपीएस लावतांना तो अशा ठिकाणी  लावा की, गाडी चोरणाऱ्यांना तो दिसणार नाही.  (BJP)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here