Big News | काय सांगता..! पुजाऱ्यांमध्ये हाणामारी; व्हिडिओ झाला व्हायरल

0
17

Big News |  बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर देवस्थान होय. या मंदिरात दर्शनासाठी देशभरातून भाविक येत असतात. निसर्गरम्य वातावरणात असलेले हे मंदिर निसर्गप्रेमींसाठीही आकर्षणाचे बिंदु आहे. या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडलेली आहे. मंदिरात गुरवांच्या दोन गटांत पूजेच्या अधिकाराहून जोरदार हाणामारी झाली आहे. पोलिसांसमोर हा सर्व प्रकार सुरु होता. अखेर या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. या हाणामारीत काही जण किरकोळ जखमीदेखील झाले आहेत. यापूर्वी त्र्यंबकेश्वरमध्येसुद्धा असाच पुजाऱ्यांमध्ये हाणामारीचा प्रकार घडला होता.

नक्की काय घडलं?

भीमाशंकर मंदिरात पुजा करण्यावरून पुजाऱ्यांमध्ये वाद सुरु आहेत. सोमवारी नेहमीप्रमाणे भाविक दर्शनासाठी रांगेत उभे होते. त्यावेळी दुसऱ्या गटाचा जमाव मंदिराच्या गाभाऱ्यात शिरला. यावेळी पाटावर पुजेसाठी बसलेले पुजारी विजय भिमाजी कौदरे यांना दमदाटी करून पाटावरून उठवण्यात आले. त्यानंतर दमदाटी आणि शिविगाळ करून धक्काबुक्कीदेखील करण्यात आली. अशी तक्रार गोरक्ष यशवंत कौदरे यांनी दिलेली आहे. त्यावरुन एका गटाच्या पंधरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच शंकर कौदरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार २१ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

पुजाऱ्यांमध्ये झालेल्या हाणामारीचे हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत. त्यानंतर यासंदर्भात नाराजीच्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. या प्रकाराबाबत देवस्थानचे अध्यक्ष ॲड. सुरेश कौदरे यांना सांगितले आहे की, पुजेच्या कामात अडथळा निर्माण करण्याचे काम सातत्याने काही जण करत आहेत. हे सगळे लोक आमचेच आहेत. या प्रकरणावर सामोपचाराने तोडगा काढण्यात येणार आहे.

Nashik | कांदा, टोमॅटोमुळे शेतकऱ्यांचे अर्थचक्र बिघडले; भांडवल नसल्याने द्राक्षछाटणीवर परिणाम

यापूर्वी त्र्यंबकेश्वरमध्ये घडला होता असाच प्रकार

पुजाऱ्यांमधील वादाचे हाणामारीत रुपांतर होण्याचा प्रकार यापूर्वी नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये घडला होता. त्यावेळी हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले होते. पुजाऱ्यांच्या गटात होणाऱ्या या वादासंदर्भात सर्वसामान्य भाविकांमध्ये नाराजी व्यक्त होताना दिसत आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here