Skip to content

सावधान ! 5 जी इंटरनेट सेवेच्या नावाखाली होऊ शकते फसवणूक.


द पॉईंट नाऊ: देशात नुकतेच 5 जी इंटरनेट सेवा प्रणालीचे उद्घाटन झाले आहे. यामुळे ही प्रणाली आपल्या मोबाईलमध्ये अपडेट करण्यासाठी प्रत्येकजण आतूर असणे स्वाभाविक आहे. याचाच गैरफायदा सायबर गुन्हेगारांकडून घेतला जात आहे. सीमकार्ड प्रजी अपडेट करण्याच्या नावाखाली ‘केवायसी करिता मूळ माहिती घेऊन एका लिंकवर क्लीक करताच आर्थिक फसवणूक होते. यामुळे नागरिकांनी अशा प्रकारच्या फसव्या कॉल्सला प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

सायबर गुन्हेगार ५जी इंटरनेट प्रणाली अपडेट करण्याचा बनाव करत नागरिकांची ऑनलाईन पद्धतीने फसवणूक करताना दिसून येत आहे. मुंबई, पुण्यापाठोपाठ नाशिकमध्येदेखील अशा प्रकारच्या तक्रारी सायबर पोलिसांकडे प्राप्त झाल्या आहेत. यामुळे शहर सायबर पोलीस ठाण्याकडून एक प्रकारचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये पोलिसांनी सायबर गुन्हेगारांच्या फसवणुकीच्या या नव्या फंड्याबाबत जागरूक केले आहे. नागरिकांनी अशा प्रकारच्या कुठल्याही फोन कॉल अथवा मेसेजवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.5जी इंटरनेट प्रणाली सध्याच्या ४जी पेक्षाही जास्त वेगवान व अन्य सोयीसुविधा देणारी आहे. यामुळे नागरिकांना ती प्रणाली आपल्या मोबाईलमध्ये हवी असते. यासाठी नागरिक अशा फोन कॉल्सवर विश्वास

ठेवून स्वतःहून सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकतात. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सायबर पोलिसांकडे धाव घेतात. तोपर्यंत उशीर झालेला असतो. सायबर गुन्हेगार है परराज्यांमधून जाळे टाकतात, त्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहचणे शक्य होत नाही, असे पोलिसांनी सांगितले.

ऑनलाइन फसवणुकीचा 5 जीचा नवा फंडा

सायबर गुन्हेगार 4जी मोबाईल अपडेट करून देण्याचा बहाणा करतात. त्यांची संपूर्ण माहिती भरण्यास सांगतात. तसेच त्यांच्याकडून बँक डिटेल्सदेखील घेतात. प्रोसेसिंग शुल्क भरण्यास सांगून एक लिंक पाठवतात.

कुठल्याही लिंकवर फाईव्ह जी सेवा अपडेट होत नाही

■ सायबर गुन्हेगार नागरिकांना सांगतात, ‘तुम्हाला आमच्या स्टोअरमध्ये किंवा कार्यालयात येण्याची गरज ‘नाही’ असे सांगून विश्वास संपादन करतात.

■ यानंतर एक लिंक पाठवून त्यावर क्लीक करण्यास सांगतात. लिंकवर क्लीक केल्यास सर्व माहिती सायबर गुन्हेगाराला समजते.

अशी घ्या काळजी

■ सीमकार्ड मान्यताप्राप्त अधिकृत कंपनीच्या स्टोअरमध्ये स्वतः प्रत्यक्ष जाऊन अपडेट करावी.

■ मोबाईलवर ५जी सीमकार्ड प्रणालीसाठी पाठविल्या जाणाऱ्या लिंकवर (युआ रएल) क्लीक करू नये.

■ टीमव्हिवर, एनीडेस्क यासारखे स्क्रीन शेअरिंग अँप डाऊनलोड करू नये.

■ कुठल्याही अनोळखी व्यक्ती व ॲपमध्ये आपल्या बँकेची माहिती भरू नये,

 

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!