एनडीएसटी सोसायटीत चकोर यांची सत्ता अबाधित , विरोधकांचा धुव्वा

0
2

नाशिक : काल मतदान होत रात्री उशिरा निकाल लागला असून माध्यमिक शिक्षकांचे लक्ष लागून असलेल्या एनडीएसटी सोसायटीच्या या निवडणुकीत पतसंस्थेचे माजी अध्यक्ष मोहन चकोर यांच्या सत्ताधारी टीडीएफ प्रगती पॅनलने २१ पैकी २० जागांवर विजय मिळवला असून निर्विवाद वर्चस्व कायम राखले. विरोधात परिवर्तनला मात्र पराभवाची धूळ चारली आहे, अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले असून 12 जागा लढवणाऱ्या डीसीपीएस पॅनलला एकही जागा मिळाली नाही.

निकाला नंतर विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रांबाहेर गुलाल उधळत फटाक्यांची आतषबाजी केली. रविवारी औरंगाबाद रस्त्यावरील लक्ष्मीनारायण लॉन्स मध्ये सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. निवडणूक निर्णय अधिकारी फयाज मुलानी आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी अनिल पाटील यांनी उमेदवारांना मतमोजणी प्रक्रिया समजावली आणि प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात केली.

यावेळी माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भास्कर भगरे, शिवाजीराव निरगुडे,रवींद्र मोरे, चंद्रकांत कुशारे, बाळासाहेब सुर्यवंशी, नानासाहेब देवरे, बाळासाहेब देवरे यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.

टीडीएफ प्रगती पॅनलचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे

नाशिक सर्वसाधारण गट- निंबा कापडणीस ( ४०७६), सचिन पगार ( ३७३३)

त्रंबकेश्वर- पेठ- प्राचार्य दीपक ह्याळीज, ( ४६९३)
इगतपुरी- बाळासाहेब ढोबळे ( ४५३८)
दिंडोरी- विलास जाधव (३६४८ )
सटाणा- संजय देसले (४७९१ )
कळवण- सुरगाणा- देवळा – शांताराम देवरे (४३५६ ) , संजय पाटील, (३६४० )
मालेगाव- संजय वाघ (३९८३)
मंगेश सूर्यवंशी (३६१६)
चांदवड-ज्ञानेश्वर ठाकरे ( ३९५६)
नांदगाव- अरुण पवार (४८५६ )
येवला- गंगाधर पवार (४१)
निफाड- समीर जाधव ( ४५८४)
सिन्नर- दत्तात्रेय आदिक (४५४१ )
अनु जाती. जमाती- अशोक बागुल ( ३७९३)
एन टी- मोहन चकोर ( ५०३१)
महिला प्रतिनिधी- विजया पाटील (४११०)
भारती पाटील (३४६४)
ओबीसी- अनिल देवरे (४१०० )
मते घेऊन विजयी झाले आहे .

परिवर्तन पॅनल- नाशिक – संग्राम करंजकर ३४४३ विजयी झाले.

चकोर सर्वाधिक मतांनी विजयी
पतसंस्थेचे माजी अध्यक्ष मोहन चकोर यांच्या नेतृत्वाखाली प्रगती पॅनलचे २० उमेदवार विजयी झाले असून एनटी गटातून निवडणूक लढवत असलेल्या मोहन चकोर यांनी सर्वाधिक ५०३१ इतके मते मिळविली. त्यांनी परिवर्तनचे गोरख कुणगर यांचा १४९७ इतक्या मतांनी दणदणीत पराभव केला.

अवघ्या ४१ मतांनी पराभव
प्रगती पॅनलकडून नाशिक गटातून निवडणूक लढवत असलेले चंद्रशेखर सावंत हे एकमेव पराभूत उमेदवार ठरले. त्यांचा परिवर्तन पॅनलचे सचिन सूर्यवंशी (३२९८) यांच्याकडून अवघ्या ४१ मतांनी पराभव झाला. तर महिला गटातून परिवर्तन पॅनलच्या उमेदवार सविता देशमुख (३४५८) यांना प्रगती पॅनलच्या उमेदवार विजया पाटील (३४६४) यांच्याकडून अवघ्या सहा मतांनी पराभव स्वीकारावा लागला.

डीसीपीएस पॅनलने खातेही उघडले नाही
डीसीपीएस पॅनलच्या बारा उमेदवारांपैकी पाच उमेदवार एक हजाराच्या वर मते मिळवू शकले तर इतर उमेदवारांना एक हजारच्या आतच मतांवर समाधान मानावे लागले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here