मतदान संपले ‘या’ बाजार समितींच्या मतमोजणीला थोड्याच वेळात सुरवात; धक्कादायक निकालांची धाकधूक

0
3

नाशिक: जिल्ह्यातील १२ कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी आज रोजी एकाच दिवशी मतदान होत आहे. पाच कृषी उत्पन्न बाजार समित्यांची मतमोजणी आजच होणार आहे. यामुळे काही उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. देवळा तालुक्यात दहा जागांसाठी मतदान होत आहे. मनमाडसाठी मात्र ३० तारखेला मतदान होईल आणि १ मे रोजी मतमोजणी होणार आहे. सुरगाणा बाजार समिती बिनविरोध जाहीर करण्यांत आली आहे. जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कार्यक्रम जाहीर केला असून त्यानुसार मनमाड वगळता इतर उर्वरित बाजार समित्यांसाठी शुक्रवारी (दि. २८) मतदान होणार आहे.

देवळा तालुक्यात भाजपा जिल्हाध्यक्ष यांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली असून याठिकाणी त्यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय पॅनल मैदानात आहे. तर काही उमेदवारांनी एकत्र येत आवाहन दिले आहे मात्र त्यांना नेतृत्व नसल्याने लोक कितपत स्विकारता याकडे लक्ष असेल तरी धक्कादायक निकाल येण्याची शक्यता नाकारली जात नाही.

आज रोजी घोटी, देवळा, कळवण, दिंडोरी आणि सिन्नर बाजार समित्यांच्या निवडणुकीचा निकाल आज दुपारनंतर लागणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली आहे.

जिल्ह्यातील नाशिक, पिंपळगाव बसवंत, घोटी, देवळा, कळवण, दिंडोरी, चांदवड, येवला, नांदगाव, सिन्नर, मालेगाव, लासलगाव या कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी आज मतदान होणार आहे.

यापैकी घोटी, देवळा, कळवण, दिंडोरी आणि सिन्नर बाजार समित्यांचा निकाल आज दुपारनंतर जाहीर होणार आहे. नांदगाव बाजार समितीची मतमोजणी मात्र रविवार (दि. ३०) रोजी होणार तर मनमाड बाजार समितीसाठी ३० रोजी मतदान आणि १ मे रोजी मतमोजणी होणार आहे.

देवळा बाजार समिती
दुपारी १.३० वाजेपर्यंत
गटनिहाय झालेले मतदान / एकूण मतदान –

सोसायटी गट –४०० / ५१०
व्यापारी गट –३५० / ४३७
हमाल / तोलारी _ ९० / ९६

देवळा बाजार समिती
दुपारी ३ .३० वाजेपर्यंत
गटनिहाय झालेले मतदान / एकूण मतदान –

सोसायटी गट –४९६ / ५१०
व्यापारी गट –४२१ / ४३७
हमाल / तोलारी _ ९४/ ९६

देवळा बाजार समिती

दुपारी ४ वाजेपर्यंत

गटनिहाय झालेले मतदान / एकूण मतदान –

सोसायटी गट -५०० / ५१० (९८%)

व्यापारी गट -४२३ / ४३७(९६.७९%)

हमाल / तोलारी _ ९४/ ९६(९७.९१%)

एकूण – ९७.५०% मतदान झाले


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here