
देवळा : विंचूर प्रकाशा महामार्गावर लोहणेर गावाजवळील पेट्रोल पंम्प समोर असलेल्या गतिरोधक जवळ दोन एसटी बस व एक मालवाहतूक ट्रक यांच्यात झालेल्या तिहेरी अपघातात दोन बस चालकांसह तीन प्रवासी जखमी झाले आहेत. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही.

या बाबत सविस्तर वृत्त असे की, आज शुक्रवारी (दि २८) रोजी दुपारी दोंडाईचा आगाराची बस ( MH 14 BT 2180) सटाण्याच्या दिशेने जात असतांना लोहणेर गावाजवळील पेट्रोल पंम्प समोरील गतिरोधक जवळ हळू झाली असता, मागून येणाऱ्या कांद्याच्या भरलेल्या ट्रक ( GJ 25 U 5141) ने मागून जोरदार धडक दिली. यामुळे बसचे नियंत्रण सुटल्याने देवळ्याच्या दिशेने येत समोरून येणारी दुसऱ्या नंदुरबार – नाशिक (MH 20 BL 4039) या बसला धडक दिल्याने हा तिहेरी अपघात झाला.
या अपघातात दोन्ही बसचे नुकसान झाले असून, ट्रक जवळील शेतात पलटी झाल्याने ट्रक चे देखील नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच देवळा पोलीस निरीक्षक समीर बारावकर, उप निरीक्षक रमेश पाटील, सहा.पो. उप. निरीक्षक विनय देवरे, पोलीस नाईक सचिन भामरे, यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळावर पोहचताच अपघातग्रस्त वाहने बाजूला करत वाहतूक सुरळीत केली. जखमींना देवळा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम