Skip to content

बाजार समितीच्या तोफा थंडावल्या; यंत्रणा सज्ज


देवळा : देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उद्या दिनांक २८ रोजी १० जागांसाठी मतदान होणार असून, यासाठी शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. प्रशासनाच्या वतीने याकामी १५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुजय पोटे यांनी दिली. तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकामी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक समीर बारावरकर यांनी सांगितले.

मतदान केंद्राची पहाणी करतांना निवडणूक निर्णय अधिकारी सुजय पोटे समवेत कर्मचारी (छाया – सोमनाथ जगताप)

देवळा येथील जिल्हा परिषद मराठी मुलींची शाळा येथे मतदानासाठी तीन बुथ असणार आहेत. सकाळी ८ वाजेला प्रत्यक्ष मतदानाला सुरवता होणार असून, सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान प्रकिया सुरू राहणार आहे. यासाठी तीन बुथ वरती ३ केंद्र अध्यक्ष, ९ मतदान अधिकारी, ३ शिपाई अशी यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे.

बुथ नंबर १ मध्ये सहकारी संस्थेच्या मतदार संघातील सर्वसाधारण ७ जागेसाठी मतदान होणार असून, या गटात ५१० मतदान आहे. बुथ क्रमांक २ मध्ये व्यापारी गटासाठी २ जागेसाठी मतदान होणार असून, या गटात ४३७ मतदान आहे. बुथ क्रमांक ३ मध्ये हमाल व तोलारी गटासाठी १ जागेसाठी मतदान होणार असून, या गटात ९६ मतदान होणार आहे. चार वाजेला मतदान प्रक्रिया संपताच सायंकाळी ४ : ३० वा. मतमोजणी याच जागेवर होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुजय पोटे यांनी दिली.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!