Skip to content

उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांची सामाजिक बांधिलकी तालुक्यातील आरोग्य केंद्रांना सहा बेबी वार्मर मशीन भेट


देवळा : राज्याचे उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी आपले वडील स्व. नामदेवराव सखाराम सुर्यवंशी व आई स्व. सुशीलाबाई नामदेवराव सुर्यवंशी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ देवळा तालुक्यातील उमराणे ग्रामीण रुग्णालय, तसेच लोहोणेर, खामखेडा, मेशी, दहिवड व खर्डा ह्या आरोग्य केंद्रांना सहा बेबी वार्मर मशीन भेट देऊन आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे.

खर्डे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला बेबी वॉर्मर मशीन भेट देतांना राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी समवेत विशाल सूर्यवंशी, उपसरपंच सुनील जाधव , जितेंद्र पवार,डॉ संतोष आडे आदी कर्मचारी (छाया – सोमनाथ जगताप)

मुदतपूर्व जन्म झालेल्या बाळांवर वेळेत उपचार होऊन मृत्यु दराचे प्रमाण घटण्यास ह्या मशीनमुळे मदत होणार आहे.
बाळाचा जन्म हा साधारण नऊ महिन्यांनंतर होत असतो. परंतु काही कारणांमुळे नऊ महिने पूर्ण होण्यापूर्वीच काही बाळाचा जन्म होतो. अशा प्री मॅच्युअर बाळांच्या जन्माचे प्रमाण गेल्या काही वर्षात वाढले आहे. मुदतपूर्व प्रसूतीत जन्मलेल्या बाळाचे वजन हे पूर्ण वाढ होऊन जन्मलेल्या बाळांच्या तुलनेत खूप कमी असते. तसेच त्यांची त्वचा अतिशय नाजूक असते.अशा प्रकारच्या वेळेपूर्वी जन्मलेल्या बालकांना उपचार तातडीने मिळण्याची गरज असते.
Akbar was Hindu: ‘अकबर हिंदू होता आणि शहाजहानची आईही हिंदू’, डॉ. भालचंद्र नेमाडे
ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात जन्मलेल्या प्री मॅच्युअर बाळांवर उपचार करण्यासाठी त्यांना देवळा ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात येते. अशा परीस्थितीत बेबी वॉर्मर मशीन हे बाळाला जीवदान दणारे ठरणार आहे. यापूर्वी सुविधेअभावी बाळांना नाईलाजाने उपचारासाठी मालेगाव, नासिक येथे पाठवावे लागत होते.

खर्डे येथे डॉ. विजय सुर्यवंशी यांनी बेबी वॉर्मर मशीन प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ संतोष आडे यांच्याकडे सुपूर्द केले.येथे प्रसूतीसाठी येणाऱ्या रुग्णांची गैरसोय दूर झाल्यामुळे नागरीकांना दिलासा मिळाला आहे.
सुनील जाधव ,उपसरपंच, खर्डे


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!