Badlapur Child Abuse | बदलापूर अत्याचार प्रकरणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ॲक्शन मोडवर

0
69
Badlapur Child Abuse
Badlapur Child Abuse

Badlapur Child Abuse | नुकतंच कोलकत्ता येथे महिला डॉक्टरवर झालेल्या बलात्कार व हत्येच्या घटनेने देश हळहळलेला असतानाच बदलापूर येथे काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. पूर्व बदलापुरातील एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या निव्वळ सहा व चार वर्षाच्या मुलींवरती शाळेतील सफाई कर्मचाऱ्याकडून अत्याचार झाल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.

सदर घटना उघडकीस येताच संतप्त बदलापूरकरांनी शाळेच्या गेटवर आंदोलन करत बुधवारी बंदची हाक दिली. सदर प्रकरणावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे, “बदलापूर येथे झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी असून ज्या नराधमाने हे दुर्दैवी कृत्य केलं आहे. त्याला कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी व हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात घेऊन दोषींवर तात्काळ कारवाई करावी, असे आदेश त्यांनी यावेळी पोलीस प्रशासनाला दिले. “सदर प्रकरणावर योग्य ती कारवाई वेळेत केली जाईल. ज्यामुळे पुन्हा अशी घटना घडणार नाही.” असे देखील त्यांनी सांगितले.

Badlapur Case | लाडक्या बहिणींना पैसे नको सुरक्षा द्या; शाळेत तीन वर्षांच्या चिमूकल्यांवर अत्याचार

असे धाडस यापुढे कोणी करणार नाही – मुख्यमंत्री शिंदे 

संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपीला कडक शिक्षा करण्यात यावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पोलीस प्रशासनाला देण्यात आले आहेत. “मी याबाबतीत पोलीस आयुक्तांशी बोललो असून याप्रकरणी मुख्य आरोपीला अटक केली गेली आहे. पोलिसांनी आरोपीवर तात्काळ कारवाई करून योग्य ती कलमे लावावी व हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात घेऊन जावे असे निर्देश दिले आहेत.”

त्यासोबतच संस्थाचालकांची ही चौकशी केली जाणार असल्याचे त्यांनी यावेळेस सांगितले. याप्रकरणी संस्थाचालक व जे कोणी दोषी असतील. त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना देखील मुख्यमंत्र्यांकडून पोलीस प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. अशा प्रकारच्या घटना शाळांमध्ये घडू नये. यासाठी निश्चितच एक नियमावली तयार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले ज्यामध्ये मुख्यतः संस्थाचालकांना व शाळांना नियम लागू होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

संस्थांसाठी नवीन नियमावली 

या नियमांनुसारच आता संस्थांना कर्मचारी नेमणूक करताना तो कुठून आला आहे. त्याची पार्श्वभूमी काय आहे..? या गोष्टींची खात्री करून निवड करणे बंधनकारक ठरणार आहे. “आपण सर्व एका कुटुंबासमान आहोत. तुमच्या मुली या आमच्याही मुली आहेत.” त्यामुळे असे धक्कादायक प्रकार पुन्हा घडू नयेत. यासाठी सदर प्रकरणावर लवकरात लवकर कारवाई करून आरोपीला शिक्षेस पात्र ठरवण्यात येणार आहे. या प्रकरणात कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.

Badlapur Case | अशा नराधमांना पब्लिकली फाशी द्या, सुप्रिया सुळेंचा संताप; आंदोलन चिघळलं

प्रकरण जलदगती न्यायालयात नेण्यासाठी आजच प्रस्ताव देणार – उपमुख्यमंत्री फडणवीस

बदलापूर प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले असून दोन तासांच्या आत पोलिसांकडून आरोपीला जेरबंद करण्यात आले आहे. सदर प्रकरणात संस्थेची ही चूक असल्यामुळे दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश ठाणे पोलिसांना देण्यात आले आहेत. हे प्रकरण जलदगती न्यायालयात नेण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्यासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून ठाणे पोलीस आयुक्तांना सांगण्यात आले असून, दोषींवरती योग्य कारवाई केली जाईल असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here