Badlapur Case | लाडक्या बहिणींना पैसे नको सुरक्षा द्या; शाळेत तीन वर्षांच्या चिमूकल्यांवर अत्याचार

0
59
Nashik Crime
Nashik Crime

Badlapur Case | कोलकातामध्ये महिला डॉक्टर बलात्कार प्रकरणाचा सर्व स्तरांवरून संताप व्यक्त केला जात असतानाच आता बदलापुरमधून आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बदलापूरमधील एका नामांकित शाळेतील दोन चिमूरड्या मुलींवर शाळेतच लैंगिक अत्याचार (Sexual Abuse) झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या संतापजनक घटनेच्या विरोधात आता हजारोंच्या संख्येने संतापलेले नागरिक रस्त्यावर उतरले असून, त्यांनी संबंधित शाळेच्या गेटबाहेर आंदोलन सुरू केले आहे.

या प्रकरणातील नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत नागरिकांनी आज शहरात बंद पुकारला आहे. या बंदला नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांनी शाळेबाहेर जोरदार घोषणाबाजी करत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत चक्काजाम केला असून हे नागरिक कुठल्याही परिस्थितीत मागे हटायला तयार नाही.

Rape Case | ॲपवर ओळख अन्..; शासकीय ठेकेदाराचे महिलेवर अमानुष अत्याचार

Badlapur Case | नेमकं प्रकरण काय..?

बदलापूरमध्ये एका नामांकित शाळेत एका साडेतीन वर्षाच्या आणि एका सहा वर्षांच्या दोन चिमूल्या मुलींवर एका १५ दिवसांपूर्वी रुजू केलेल्या आधीच क्रिमीनल बॅकग्राऊंड असलेल्या कंत्राटी सफाई कामगाराने शाळेच्या स्वच्छता गृहात शारीरिक शोषण केल्याने संपूर्ण शहर हादरले आहे. तब्बल १२ दिवसांनंतर हा प्रकार मुलीच्या पालकांना समजला आणि हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणावर अखेर 4 दिवसांनंतर शाळा प्रशासनाने मौन सोडले. संबंधित शाळेच्या मुख्याध्यापिका, वर्गशिक्षिका आणि आया यांना निलंबित करण्यात आले आहे.(Badlapur Case)

याप्रकरणी मुलींच्या पालक पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेले असता त्यांना तब्बल 12 तास ताटकळत ठेवण्यात आलं होतं. त्यामुळे पोलिसांच्या भुमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. (Badlapur Sexual Abuse Case)

दुसरीकडे लहान मुलीवर झालेल्या अतिप्रसंगाविरोधात या शाळेबाहेर पालक आणि बदलापूरकर मोठ्या संख्येने एकवटले आहेत. सोबतच नागरिकांनी बदलापूर बंदलाही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. शाळेसमोर जमलेल्या नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी करत  चक्काजाम केला असून नागरिक कुठल्याही परिस्थितीत मागे हटायला तयार नाहीत. “आम्हाला लाडकी बहीण योजना नको, तर सुरक्षित बहीण योजना” असल्याची भूमिका नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

Rape Case | ‘ते’ फोटो व्हायरल केल्याची धमकी देत; कॅफेमध्येच मुलीवर अत्याचार

ए आई.. मला शुच्या जागी मुंग्या चावताय… 

“ए आई.. मला शुच्या जागी मुंग्या चावताय..” हे वाक्य एका 3 वर्षे 8 महिवे वय असलेल्या मुलीचं. आईने तिला दवाखान्यात नेल्यावर समजलं की बदलापुरमधील शाळेतल्या एका अक्षय शिंदे नावाच्या “दादा” ने चिमुरडीच्या अजानतेपणाला त्याच्या वासनेचं बळी बनवलं. बदलापुरच्या या शाळेचं नाव आहे ‘आदर्श विद्यालय’ आणि या शाळेचे ट्रस्टी हे अर्थातच obviously भ्र.ज.पा. चे पदाधिकारी नेते आहेत. तर आरोपी हा हिस्ट्री शिटर असल्याची माहिती मिळतेय मग तरीही या संस्थेवर त्याला कामाला कसं ठेवलं..?

तो संबंधित पक्षाचा पदाधिकारी आहे म्हणुन.? घटनेत एकच नाही तर आणखीही काही मुली पिडीत आहेत. या आरोपीचा हिंस्त्रपणा इतका भयानक होता की पिडीत चिमुकलीच्या थेट आतड्यांपर्यंत दुखापत झालीय. विशेष म्हणजे इतक्या जुन्या संस्थेत साधे CCTVही काम करत नाही.? पीडित मुलीचं मेडीकलही पालकांनी केलं, तक्रार मिळूनही शाळेने तोंड बंद ठेवलं होतं. हा नेमका काय प्रकार आहे? निघृण, पाशवी व अमानवी… बाकीही आणखी डिटेल्स आहेत. माझ्या चिमुरड्या बाहूलीच्या नातेवाईकांनी परवानगी दिल्यास त्यांच्या बाजुने संपूर्ण कायदेशीर भाग हा आम्ही निःशुल्क बघु आणि हवी ती कायदेशीर मदत त्यांना मिळवून देऊ. पोलिसांनाही विनंती की त्यांनी लपवाछपवी बंद करा, अशी पोस्ट शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी जयेश वाणी यांनी लिहिली असून, ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here