Skip to content

Avkali rain: वीटभट्टी उत्पादकांवर अवकाळीचा शिमगा


राम शिंदे
Avkali rain : बांधकाम क्षेत्राचा कणा असलेला वीटभट्टी व्यवसायाला अवकाळी पावसाचा फटका बसला असून गेल्या आठवडाभरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे वीटभट्टी व्यावसायिक मोठ्या संकटात सापडला आहे. त्यामुळे ऐन शिमग्यात वीटभट्टी उत्पादकांवर शिमगा ओढवला आहे. (Avkali rain)

Malegaon Politics: जनतेच्या हृदयातील योद्ध्याला हरविण्यासाठी पाच जिल्ह्यातील गर्दी कशासाठी ?

कोरोना काळात या व्यवसायावर मंदीचे सावट पसरले होते. आता कोरोना काळ गेल्याने विटांचे मागणी वाढल्याने दर देखील वाढले आहेत. यंदा वीटभट्टी व्यवसाय सर्वत्र तेजीत असून, विटांची मागणीदेखील वाढली आहे. विटेचा सध्या जागेवर प्रत्येकी ७ रुपये दर, तर जागेवर पोच ७.५० रुपये दराने विक्री होत आहे. त्यामुळे तीन वर्षांपासून घरघर लागलेल्या व्यवसायाला सुगीचे दिवस आले होते. मात्र,मार्च महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसाने पुन्हा या व्यवसायाला फटका बसला आहे.

गेल्या आठवड्यात झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे इगतपुरी तालुक्यातील टाकेद-धामणगाव परिसरात मोठ्या प्रमाणात कच्च्या विटांचा चिखल झाला आहे. अलिकडच्या दहा वर्षात अनेक सुशिक्षित बेरोजगार या व्यवसायात उतरल्याने स्पर्धेतून दर्जेदार विटांची निर्मिती धामणगाव टाकेद परिसरसह इगतपुरी तालुक्यात केली जात आहे. तालुक्‍यात लहान मोठे व्यवसायिक, शेतकरी शेतातील मातीचा उपयोग करून वीटभट्टी व्यवसाय करतात.

मात्र, यावर्षी अचानक वातावरणात बिघाड होऊन अवकाळी पावसाने दाणादाण उडवली. परिणामी, या व्यवसायासाठी आवश्‍यक असणारी पूर्वतयारी करणे अवघड झाले आहे. विशेष म्हणजे अचानक मध्य रात्री कोसळणाऱ्या पावसामुळे विटांचे सरंक्षण करण्यासाठी व्यावसायिकांना अवधीचं मिळाला नाही. त्यामुळे अनेक अडचणी निर्माण होऊन वीट व्यावसायिक संकटात सापडले आहेत.अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसाणीमुळे वीट भट्टी व्यवसायिकांची पूर्ण मेहनत मातीमोल।झाली असून मजुरांचा खर्च देखील सोसेना झालाय.

तेजीत आलेल्या व्यवसायाला अचानक अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.गेल्या आठवड्यात रात्रीच्या वेळी मुसळधार पाऊस सुरू झाल्याने सरंक्षणात्मक उपाययोजना करता आली नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून आर्थिक फटका बसला आहे.
मंगेश गाढवे, वीट उत्पादक


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!