Malegaon Politics: नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे ( Dada bhuse ) यांनी आपल्या कामाच्या जोरावर जनतेत आपली एक ओळख निर्माण केली. ठराविक नेते असतात ज्यांना जनाधार लाभलेला असतो त्यातील भुसे हे एक राज्यातील महत्त्वाचे जन सामन्यांतील नेतृत्व आहे. राज्यात बंडाळी झाल्यानंतर दादा भुसे नेमके कुणाकडे ? याकडे शिवसैनिकांसह राज्यातील नेत्यांचे लक्ष लागून होते. ज्यावेळी काही आमदार सूरत पोहचले त्यावेळी दादा भुसे मात्र मातोश्रीवर मध्यस्थी करण्याच्या भूमिकेत होते, मातोश्रीवरील चांडाळ चौकडीने शिवसेनेला सुरुंग लावण्याचे मनात पक्के ठरवले होते. यामुळे भुसेंच्या स्वप्नातील अखंड शिवसेनेचे स्वप्न अधुरे राहिले. पक्षातील बंडाळी थोपविण्यासाठी भुसे यांनी प्रयत्न देखील केले. मात्र सेनेतील वाचाळवीर काही जुळवण्याच्या मनस्थितीत नव्हते त्यातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचे ब्रेन वॉश करत चुकीचा निर्णय घेण्यास भाग पाडले. यामुळे व्यथित झालेल्या भुसे यांनी आपल्या आयुष्यातील अनपेक्षित निर्णय घेत एकनाथ शिंदे यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेतांना त्यांना देखील वेदना झाल्या असतील यात काही शंका नाही. मात्र या बंडाळीचा फायदा घेत कायम पक्ष बदलणाऱ्या हिरे घराण्यातील युवराजाने थेट ठाकरेंना भेटून पारंपारिक विरोधक भुसे यांना आवाहन देण्यासाठी दंड थोपटले. ठाकरे दरबारी आपले वजन आहे हे दाखविण्यासाठी सभा आयोजित केली अन् त्याची तयारी देखील जोमात सुरू आहे. (Malegaon Politics)
Rahul Gandhi Disqualified: राहुल गांधींना संसदेतून ‘टाटा बाय-बाय’
शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर दादाजी भुसे यांना नाशिक जिल्हा पालकमंत्री पदाची महत्वाची जबाबदारी मिळाली. त्यांनी कुणाच्याही टिकेला उत्तर न देता घाणेरड्या राजकारणाच्या पलीकडे जात आपल्या विकास कामाचा धडाका सुरू केला हे सर्व सुरू असतांना मालेगाव बाह्य मतदार संघात भुसे यांना अडकवून ठेवण्यासाठी व्यूहरचना आखली जात होती. मात्र भुसे यांनी याकडे फारसे लक्ष न देता नेहमीप्रमाणे आपल्या विकास कामांचा धडाका सुरू ठेवला. मतदार संघातील काही स्वार्थी आणि महत्वाकांक्षी तथाकथित नेत्यांनी एकत्रित येत मालेगाव तालुक्यात काही प्रवेश घडवून आणले. खर म्हणजे आजपर्यंत अनेक पक्ष बदलून आलेले स्वयंघोषित पुढारी आम्ही उद्धव ठाकरे यांच्याशी किती निष्ठावंत आहोत असे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. मात्र जनतेला देखील माहीत आहे, दलबदलू नेत्यांचे काम कोणते आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी गर्दी जमेल देखील शेवटी हा प्रश्न असेल की ‘गर्दी जमली की जमवली गेली.’ एकट्या दादा भुसे यांना रोखण्यासाठी तुम्हाला पाच जिल्ह्यातून गर्दी आणावी लागते. याचा अर्थ स्थानिक मालेगाव तालुक्यातील जनता तुमच्यासोबत किती आहे ? याचा विचार होणे देखील गरजेचे आहे. तुमच्यामागे जनता असती तर मालेगाव तालुका वगळता बाहेरून गर्दी आणण्याची वेळ आली नसती. Malegaon Politics
आत्मिक समाधानासाठी महत्वकांक्षी नेते पाच जिल्ह्यातून गर्दी जमवून मैदान भरतील मात्र त्याचे परिवर्तन मतपेटीत होणार नाही याची जाणीव देखील असणे गरजेचे आहे. मालेगावच नव्हे तर राज्यातील अनेक भागात दादाजी भुसे यांना मानणारा वर्ग मोठा आहे. भुसे यांनी आपल्या सोबत जोडलेली माणसे ही जिव्हाळ्याची आहेत. कामातून जोडलेली जनता अशा सभांनी कधीही दूर जात नाही, याची जाणीव विरोधकांना देखील आहे. शेवटी त्यांना धडपड करण्याशिवाय पर्याय नाही. यापलीकडे ते काही करू शकत नसल्याने त्यांना असे छोटे मोठे उद्योग चर्चेत राहण्यासाठी करावे लागतात.
दादा भुसे प्रत्येकाला आपल्या कुटुंबातील जबाबदार व्यक्ती वाटत असते. चारित्र्य संपन्न व्यक्तिमहत्व म्हणुन भुसे यांची प्रतिमा उजळ आहे, महिला, मुलींचा आदर आपल्या बहिणीसारखा, लेकीसारखा केला अशा कुटुंब प्रमुखाला हरवण्याची ताकद कुणातच नाही. जेव्हा निवडणूक येते तेव्हा भुसे यांची निवडणूक ही जनतेच्या हातात असते, कारण प्रत्येक गावात विकास काम झालेली आहेत. प्रत्येकाच्या दुख:त सहभागी असतात. एकवेळ आनंदाच्या वेळी भुसे हे सहभागी होणार नाही. मात्र दुख:त सर्वांच्या पुढे असतात अशा जनतेतील योध्याला हरवण्यासाठी पाच जिल्ह्यातील गर्दी कामात येणार नाही हे देखील सत्य आहे. Malegaon Politics
हिरे घराण्याकडे पाच दशक सत्ता
हिरे घराण्याकडे पाच दशकं सत्ता असताना त्यांनी मालेगाव करांसाठी काय विकास कामे केली. याचा विकास अहवाल त्यांनी सभेत मांडावा जेणेकरून जनता तुलना करून बघेल. शैक्षणिक क्षेत्रात सत्ता असताना विद्यार्थी हितासाठी नेमक काय केलं आपल्या कर्मचाऱ्यांना काय वागणूक दिली. किती भूमिपुत्रांना नोकरी दिली हे मांडणे देखील महत्वाचे आहे. जेणेकरून जनता ही मुल्यमापन करून तुमचे काम योग्य असेल तर नक्कीच पाठीशी उभी राहील फक्त आरोपांच्या फैरी झाडतांना आत्मपरीक्षण महत्वाचे आहे.
भुसेंची दोन दशक सत्ता
भुसे यांनी आमदार झाल्यानंतर सर्वप्रथम जलसिंचन विभागात मोठे कार्य केले आहे. काष्टी येथे कृषी महाविद्यालय, अजंग येथे MIDC , बोरी आंबेदरी कालवा, यासारखे छोटे मोठे अनेक विकास काम केले आहेत. यामुळे हिरे विरुद्ध भुसे संघर्षात विकास कामांवर चर्चा झाल्यास कोण वरचढ असेल हे जनताच ठरवेल यात शंका नाही.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम