Another unfortunate incident in Igatpuri इगतपुरी तालुक्यामध्ये गावातून रस्ताच नसल्यामुळे एका गरोदर मातेला कित्येक किलोमीटर पायी चालत जावं लागलं होतं. यात झालेल्या अतिश्रमामुळे या गरोदर महिलेचा तिच्या पोटातील बाळासह दुर्दैवी मृत्यू झाला आणि यामुळे राज्यातील खेड्यापाड्यांवर रस्तेच नसल्याचं वास्तव पुन्हा एकदा अधोरेखित झालं. अशीच एक घटना पुन्हा एकदा समोर आली घोटी येथील टाके या ठिकाणच्या आदिवासी कातकरी पाड्यावर रस्ता नसल्याने मृत शरीरालाही मरण यातना सहन कराव्या लागल्या आहेत.
कातकरी पाड्यावरील वस्ती मधील एका गृहस्थाचा मृत्यू झाला आणि त्याचा अंत्यविधी करण्यासाठी मृतदेह स्मशानभूमीत घेऊन जाण्यासाठी रस्ताच नसल्याने अंत्यविधी दिवसभर अडून पडला. त्या या पाड्यावरून गावाला जोडणारी एकच पायवाट आहे आणि ती पायवाट देखील एका शेतातून जाते आणि या शेतमालकाने मृतदेह शेतातून घेऊन जाण्यास नकार दिल्याने ही घटना घडली.
दरम्यान याबाबत इगतपुरीचे तहसीलदार अभिजीत बारवकर आणि पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत पोलीस बंदोबस्तामध्ये या मृतदेहाच्या अंत्यसंस्कारा साठी वाट मोकळी करून दिली आणि त्यानंतर त्या मृतदेहाचा अंत्यसंस्कार विधी पार पडला.
https://thepointnow.in/major-accident-on-nashik-pune-highway/
एकीकडे गावातनं रस्ता नाही म्हणून गरोदर मातेला आणि तिच्या बाळाला आपला जीव गमवावा लागला तर दुसरीकडे मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी पोलिसांना धावून जावं लागलं. अशी दुर्दैवी अवस्था सध्या नाशिक जिल्ह्याची झाली आहे. यातच कातकरी आदिवासी समाजासाठी कोट्यावधी रुपयांच्या योजना आदिवासी विकास विभागाच्या आहेत. मात्र आजही कातकरी पाडा या योजनांपासून वंचित असल्याच समोर आलं आहे.
आदिवासी कातकरी समाजासाठी आदिवासी विकास विभागाच्या मार्फत कोट्यावधी रुपयांच्या योजना मंजूर झाले आहेत. मात्र आजही वाड्यावर त्यांमध्ये या योजना पोहोचल्या नाहीत म्हणून फक्त नाशिक मधीलच नाही तर राज्यातील कितीतरी आदिवासी पाड्यांची दशाही दयनीय झाली आहे.
भगवान मधे – संस्थापक – एल्गार कष्टकरी संघटना
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम