breaking news : नाशिक पुणे हायवेवर भीषण अपघात ; इतके जण जखमी


Accident on nashik pune highway : राज्यात अपघातांचे सत्र वाढतच चालले आहे. राज्यात ठिकठिकाणी झालेल्या अपघातांच्या सत्रानंतर संपूर्ण राज्य हादरून निघाले होते. यातच आणखी एक अपघात समोर आला आहे. पुणे-नाशिक महामार्गावरील चांडोली टोलनाक्या जवळ तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवित हानी झाली नसून काहीजण गंभीर जखमी झाले आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दूध वाहतूक करणाऱ्या दोन ट्रकमध्ये हा अपघात झाला असून या अपघातामध्ये दोन्ही वाहनांचे चालक गंभीर जखमी झाले असल्याच सांगण्यात येत आहे. तसेच जखमींना पुढील उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान हा अपघात इतका भीषण होता की यात वाहन चालकांना वाहनातून खेचून बाहेर काढावे लागले आहे.

दरम्यान, या अपघातामुळे महामार्गावर मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून नाशिककडे येणाऱ्या वाहनांच्या चार ते पाच किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत.

https://thepointnow.in/threatening-call-to-cricketer-yuvrajs-mother/

या अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच स्थानिक खेड पोलीसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्याचे काम सुरु आहे. तर निर्माण झालेली वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Leave a Comment

Don`t copy text!