Breaking news : नाशिक महानगरपालिकेतील लाचखोर शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांच्या अडचणीमध्ये वाढ, लाचखोर सुनिता धनगर यांच्या बेहिशोबी मालमत्तेची ईडी कडून चौकशी करण्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली आहे.
काय आहे प्रकरण?
नाशिक महापालिकेच्या लाचखोर शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांना ५० हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले होते. त्यांच्यासह लिपिक नितीन जोशी यालाही पाच हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले होते.
यांनंतर त्यांची व त्यांच्याकडील मालमत्तेची कसून चौकशी करण्यात आली होती. ज्यामाध्ये त्यांच्या एसबीआय बँकेच्या एका खात्यात १२ लाख ७१ हजार रुपये जमा असल्याची बाब समोर आली होती.
पहिल्याच दिवशी धनगर यांच्याघरातून ८५ लाख रुपये रोख व ३२ तोळे सोने असे कोट्यवधींचे घबाड सापडले होते. पोलीस अधिक्षक शमिष्ठा वालावलकर नाशिक परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. संदिप घुगे व पो. नि. गायत्री जाधव यांनी सापळा कारवाई केली होती.
निवृत्तीसाठी अवघा एक वर्षांचा कालावधी बाकी असताना सुनीता धनगर यांना ५० हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बेड्या ठोकल्या. एका खासगी शैक्षणिक संस्थेतून बडतर्फ करण्यात आलेल्या मुख्याध्यापकाला सेवेत न घेणाऱ्या संस्थेविरोधात कारवाई करण्यासाठी पत्र देण्याच्या मोबदल्यात धनगर यांनी हे पैसे स्वीकारले होते.
लाच देण्याची इच्छा नसल्याने मुख्याध्यापकाने लाचलुचपत प्रतिबंधित विभागाकडे तक्रार केली होती. दरम्यान तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक संदीप घुगे यांनी पोलीस कोठडी दरम्यान लाचखोर धनगर यांच्या बँक खात्याबाबत तपास केला होता.
त्यात स्टेट बँक ऑफ इंडीया, मधील चार वेगवेगळया खात्यात १५९६२०१, २८१४३५, १२७१०२८ व ३६२२७ रुपये व नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. नाशिक मधील खात्यावर ३१७२९ रुपये असे एकूण ३०,१६,६२० रूपये ऐवढी रक्कम मिळून आली आहे.
दरम्यान लाचखोर शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांच्याकडे मिळून आलेल्या बेशबी मालमत्तेची कसून चौकशी होणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये केल्यामुळे त्यांच्या अडचणीत आता मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम