Anita Birje : ठाणे | ठाण्यात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला असून, दिवंगत आनंद दिघे यांच्या काळापासून शिवसेनेत सक्रिय असलेल्या अनिता बिर्जे (Anita Birje) यांनी उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र ठोकत एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) शिवसेनेत प्रवेश केला आहे. काल उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची ठाण्यात सभा होती आणि कालच अनिता बिर्जे यांनी शिंदे गटात पक्ष प्रवेश केला.
शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळात आनंद दिघे यांच्यासोबत अनिता बिर्जे यांनी शिवसेनेची महिला आघाडी ठाणेसह इतर भागात तळागाळात पोहचवली होती. त्यांच्या प्रवेशामुळे बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांवर चालणाऱ्या शिवसेनेला एक नवीन बळ मिळाले असून, त्यांच्या अनुभवी नेतृत्वात येणाऱ्या काळात शिवसेना आणखी जोमाने काम करेल, असा विश्वास यावेळी एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला.
Nashik News | नाशिकमध्ये ठाकरेंना मोठा धक्का; माजी मंत्री शिंदे गटात..?
Anita Birje | उद्धव ठाकरेंची साथ का सोडली?
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील पक्ष प्रवेशानंतर अनिता बिर्जे यांनी ठाकरे गट सोडण्यामागील कारण सांगितले असून, आपण राजकारणासाठी नाही तर समाज सेवेसाठी शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे अनिता बिर्जे म्हणाल्या. मी आधीच म्हणाले होते की, एकनाथ शिंदे आणि राजन विचार हे दोघे एकत्र यायला पाहिजे आणि आगामी काळात ते घडणार, असा दावाही यावेळी अनिता बिर्जे यांनी केला आहे. आज माझा भाऊ हा मुख्यमंत्री आहे आणि त्यामुळे माझा या भावाचा उपयोग हा राज्यातील तळागाळातील सर्व महिला भगिनींना व्हायला पाहिजे, असं अनिता बिर्जे यांनी सांगितलं.
Maharashtra Politics| ठाकरेंना मोठा धक्का..! तीन मोठे नेते शिंदेंच्या गळाला
ठाण्यात ठाकरेंना दूसरा मोठा धक्का
शिवसेनेत एकणतः शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर अनिता बिर्जे यांनी उद्धव ठाकरेंची साथ दिली होती. त्या ठाकरे गटाच्या ठाणे महिला आघाडी प्रमुख पदी कार्यकरत होत्या. ठाण्यात लोकसभा निवडणुकीत राजन विचारे यांच्या पराभवानंतर अनिता बिर्जे यांचा शिंदे गटात प्रवेश हा उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम