देवळा | येथे उद्या शनिवार (दि.१०) पासून दुर्गा माता मंदिरात गणेशपुरी महाराज, देवदारेश्वर कन्हैया महाराज, संजय नाना धोंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे ५ वाजता काकडा भजन, रोज सकाळी ८ वाजता खडू महाराज गिगावकर यांच्या उपस्थितीत ज्ञानेश्वरी पारायण, रोज रात्री ९ वाजता हरी कीर्तन, शुक्रवारी दि.१६ रोजी दुपारी ३ वाजता ज्ञानेश्वरी ग्रंथ मिरवणूक आदी विविध धार्मिक कार्यक्रमांचे यानिमित्ताने आयोजन करण्यात आले आहे.
Deola | कृषी तज्ञ रामदास पाटील यांच्या हस्ते आहेर महाविद्यालयात कृषी मार्गदर्शन केंद्राचे उदघाटन
कीर्तन सेवा पुढीलप्रमाणे –
- शनिवारी दि.१० – निवृत्ती महाराज (खडकमाळेगाव)
- रविवारी दि.११ – बाळकृष्ण महाराज (सिन्नर)
- सोमवारी दि.१२ – समाधान महाराज (रिंगणगावकर)
- मंगळवारी दि.१३ – भगीरथ महाराज (आळंदी)
- बुधवार दि.१४ – केशव महाराज (बारामती)
- गुरुवारी दि.१५ – पद्माकर महाराज (अमरावती)
- शुक्रवारी दि.१६ – जयंत गोसावी (त्रंबकेश्वर)
- शनिवारी दि.१८ – कीर्तन केसरी संजय नाना धोंडगे यांचे सकाळी ९ वाजता काल्याचे कीर्तन होऊन सप्ताहाची सांगता होईल व उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येईल. या कार्यक्रमाचा देवळा व परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन भजनी मंडळाने केले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम