Jansanman Yatra | राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा देवळ्यात; नेतेमंडळींची देवळा वासीयांना साद

0
105
Jansanman Yatra
Jansanman Yatra

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा |  राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने देवळा येथे आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, मंत्री अनिल पाटील यांचे रविवारी दि.११ रोजी जल्लोषात स्वागत करण्यात आले. मात्र, यामुळे सुमारे एक तास शहरातील वाहतूक ठप्प झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा ही सध्या नाशिकमध्ये असून, या निमित्ताने सहभागी नेतेमंडळींनी देवळा येथे भेट देऊन येथील शिवस्मारकाजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

लाडकी बहीण योजना पाच वर्षे सुरू राहील – सुनील तटकरे 

यावेळी खास करून महिलांना संबोधित करतांना खासदार सुनील तटकरे म्हणाले की, “राज्य शासनाने महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणून महिलांचा सन्मान केला असून रक्षाबंधनाच्या दोन दिवस आधी दीड कोटी महिलांच्या खात्यात जुलै व ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे एकूण तीन हजार रुपये जमा होतील. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या निमित्ताने रक्षाबंधन भेट दिली जाणार असल्याचे तटकरे म्हणाले. विरोधकांकडून जरी या योजनेसंदर्भात शंका घेत जनतेची दिशाभूल केली जात असली तरी सदरची योजना ही सलग पाच वर्षे सुरू राहणार असल्याची ग्वाही देखील यावेळी त्यांनी दिली. तसेच शेतकऱ्यांचे मागील सर्व थकीत वीज बिल माफ केले असून, यासाठी जनतेचा आशीर्वाद महायुती सरकारच्या पाठीमागे कायम राहील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.(Jansanman Yatra)

Jansanman Yatra | ‘पक्ष म्हणत होता खासदार व्हा, पण मला फक्त मराठीच येतं’; झिरवाळांचं मिश्किल भाषण अन् घोषणा

विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाची जबाबदारी राज्य शासनाची – रुपाली चाकणकर

यावेळी रुपाली चाकणकर यांनी आदिवासी नृत्य सादर करणाऱ्या विद्यार्थीनींचे कौतुक केले. उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना लागणाऱ्या आर्थिक स्वरूपाची जबाबदारी राज्य सरकारने घेतली असून राज्यातील शेतकरी, शेतमजूर, पदवीच्या युवकांसाठी विशेष योजना आणल्या आहे. त्यांनाही रोजगाराच्या माध्यमातून दरमहा आर्थिक मदत शासन करीत असल्याची माहिती रुपाली चांकणकर यांनी दिली.(Jansanman Yatra)

Jansanman Yatra | वडिलांकडून लपवाछपवी अन् लेक म्हणतो माझी उमेदवारी पक्की..?; झिरवाळ पितापुत्रांचं काही कळेना..!

Jansanman Yatra |  सुमारे एक ते दीड किमीपर्यंत वाहतूक ठप्प

रविवार हा येथील आठवडे बाजार असल्याने परिसरातील नागरिकांनी कार्यक्रमास मोठी उपस्थिती दर्शवली होती. यामुळे देवळा शहरातील पाच कंदिल परिसरात सर्व बाजूने सुमारे एक ते दीड किमीपर्यंत वाहतूक ठप्प झाल्याने पोलिस प्रशासनाची पुरती धावपळ उडाली होती.

यावेळी देवळ्याचे भूमिपुत्र राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष उदयकुमार आहेर यांनी प्रास्ताविक करत स्वागत केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गोरख निकम यांनी केले. यावेळी देवळा नगरपंचायतीचे विरोधी गटनेते संतोष शिंदे, बाजार समितीचे माजी संचालक जगदीश पवार, अश्विनी आहेर, मनोज गुजरे, मनोहर खैरनार, मनोज आहिरराव, स्वप्निल आहेर, अशोक सुराणा, अनिल आहेर, गोविंद सोनवणे, प्रेमांनद देवरे, सागर खरोटे, आदींसह महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here