‘सर्वपक्षीय-राजकीय नेत्यांना गावात प्रवेश बंदी’; असा निर्णय घेणारं गाव नक्की कोणतं?

0
17

सांगली : मराठा आरक्षण हा प्रश्न सुटेपर्यंत कायद्याच्या पदावर बसलेल्या कोणत्याही राजकीय नेत्याला या गावात येऊ दिले जाणार नाही. या मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनाला सांगली जिल्ह्यातून जोरदार प्रतिसाद मिळायला सुरवात झालेली आहे. खानापूर तालुक्यातील हिंगणगादे येथील ग्रामस्थांनी  सर्वपक्षीय-राजकीय नेत्यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. राज्यातील कोणत्याही पुढाऱ्यांना गावात ‘प्रवेश बंदी’ असा मोठा फलक गावाच्या दर्शनी भागावर लावण्यात आला आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सकल मराठा समाज आक्रमक झालेला आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांच्या आदेशानुसार राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात येते आहे.  या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे-पाटील यांनी निर्णायक आंदोलनही जाहीर केले आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे.  त्यांनी आंतरवली-सराटी या आपल्या गावात राजकीय नेत्यांना गावबंदी केली आहे. असाच निर्णय महाराष्ट्राातील सर्व गावांनी घ्यावा अशी विनंती मनोज जरांगे-पाटील यांनी केली आहे. या विनंतीला मान देत खानापूर तालुक्यातील हिंगणगादे गावातील ग्रामस्थनी शंकर मोहिते यांच्या नेतृत्वाखाली आरक्षण मिळेपर्यंत कोणत्याही राजकीय नेत्याला गावात येऊ द्यायचे नाही, असा निर्णय घेतला आहे.

Big News | महाराष्ट्रात जाणवले इस्त्राईल आणि हमास युद्धाचे पडसाद… नेमके घडलं काय?

मराठा समाज राजकीय नेत्यांना त्यांची जागा दाखवणार

आम्ही मनोज जरांगे-पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोतच. राज्यातील नेते नारायण राणे, रामदास कदम या वाचाळवीरांनी मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी धडपड सुरू केल्याचे दिसते आहे. मात्र आगामी काळात आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्वच राजकीय नेत्यांना मराठा समाज त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही देण्यात आला आहे.

Dasara | सणांच्या तोंडावर झेंडूच्या फुलांमुळे शेतकऱ्यांसमोर संकट…

येवल्यातील देवरगाव-कातरणी येथे नेत्यांना प्रवेशबंदी

मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी लढा उभारला असून या लढ्याला मराठा समाजातून पाठिंबा मिळताना दिसत आहे. मनोज जरांगे-पाटील यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे मराठा समाज आरक्षणाला विरोध करणारे राजकीय नेते आणि कार्यकर्ते सध्या अडचणीत आलेले आहेत. नाशिकच्या येवला तालुक्यातील कातरणी येथे ग्रामसभा घेण्यात येऊन मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आलेली आहे. तर देवरगाव ग्रामपंचायतीने तहसीलदारांना पत्र देत आरक्षण विरोधी पुढाऱ्यांना गावात ‘प्रवेश बंदी’ असा मोठा फलक गावाच्या दर्शनी भागावर लावलेला आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here