Akshya Shinde | महिनाभरापूर्वी बदलापूर येथील नामांकित शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेने काल सोमवारी 23 सप्टेंबर रोजी पोलिसांच्या हातातील बंदूक हिसकावून गोळीबार केला आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी गोळीबार केला, या गोळीबारात अक्षय शिंदेचा मृत्यू झाला. ही घटना घडली त्यानंतर, विरोधकांकडून हा एन्काऊंटर दुर्लक्षित कारभारामुळे झाला असल्याची टीका होत आहे. तर आता अक्षय शिंदेच्या कुटुंबीयांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी नकार दिला आहे.
Badalapur Case | बदलापूर लैगिंक आत्याचार प्रकरणातील आरोपीचा एन्काऊंटर; नेमक काय घडलं…?
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बदलापुरातील घटना उघडकीस आल्यानंतर संतप्त लोकांनी अक्षय शिंदेच्या कुटुंबीयांना गावातून उसकावून लावले होते. त्याच्या घराची तोडफोड देखील केली गेली होती. अक्षय शिंदे हा 24 वर्षाचा होता आणि त्याची तीन लग्न झाली होती. पण त्यांच्यापैकी एकही पत्नी त्याच्यासोबत संसार करायला तयार नव्हती.
नेमकं काय घडलें?
अक्षयच्या दुसऱ्या पत्नीने दिलेल्या तक्रारी वरूनच पोलिसांनी त्याच्याविरुद्ध अनैसर्गिक लैंगिक संबंध प्रस्थापित केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठीच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. सोमवारी संध्याकाळी पोलिस त्याला तळोजा कारागृहातून बाहेर घेऊन जात असताना, त्याने वाहना शेजारी बसलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांची रिवॉल्वर हिसकावून गोळीबार केला. यात निलेश मोरे जखमी देखील झाले. अक्षय पळून जाण्याची भीती असल्याने सीआययुचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी त्यांच्या रिवाल्वर मधून अक्षयच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्या. या गोळीबारात तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर कळवा महापालिका रुग्णालयात नेल्यानंतर त्याला मृत घोषित करण्यात आले.
कोण आहेत संजय शिंदे?
बदलापूर बलात्कार प्रकरणाच्या तपासासाठी नेमून दिलेल्या विशेष तपास पथकाचे संजय शिंदे अधिकारी आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत प्रदीप शर्मा यांच्या सोबत काम केलेले आहे. त्यांचे देशातील प्रसिद्ध एन्काऊंटर स्पेशालिस्टमध्ये नाव घेतले जाते.
Sanjay Raut | “…म्हणून अक्षय शिंदेचा एन्काऊंटर केला”; संजय राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
काय म्हणाली अक्षयची आई?
“त्याने कधी साधे फटाके फोडले नाहीत, तो बंदूक खेचून गोळीबार कसा करू शकतो. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी. प्रशासनाच्या दबावातून हे करण्यात आले आहे. सोमवारी दुपारी आमची अक्षय सोबत तळोजा कारागृहात भेटही झाली होती. आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही.” आमचा मुलगा निर्दोष असून त्याला या प्रकरणात गोवण्यात आले असल्याचा आरोप अक्षय शिंदेच्या आई-वडिलांनी केला आहे. त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रारही दाखल केली होती.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम