Ajit Pawar | अजित दादांना मोठा धक्का!; ‘हा’ बडा नेता ठाकरेंच्या हाती

0
12
Ajit Pawar
Ajit Pawar

Ajit Pawar |  अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पुण्यातून एक मोठा धक्का बसला आहे. अजित पवार पालकमंत्री असलेल्या पुण्यातच अजित पवार गटाचा मोठा नेता हा उद्धव ठकरेंच्या गळाला लागला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पुण्यातूनच अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे. अजित पवारांच्या कट्टर समर्थक असलेल्या एका नेत्याने शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात जाहिर प्रवेश केला आहे.(Ajit Pawar)

अजित पवार यांचे खंदे समर्थक असलेले संजोग वाघेरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित आज ठाकरे गटात प्रवेश केला आहे. मुंबईमध्ये ‘मातोश्री’ वर ठाकरे यांच्या निवासस्थानी संजोग वाघेरे यांनी जाहीररीत्या पक्ष प्रवेश केला आहे. दरम्यान, यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांसह अन्य बडे नेते हे उपस्थित होते.(Ajit Pawar)

Chandwad | चांदवड येथे लाचखोर सरपंच, उपसरपंच एसीबीच्या जाळ्यात

कोण आहेत संजोग वाघेरे ?

१. संजोग वाघेरे हे माजी महापौर दिवंगत भिकू वाघेरे यांचे पुत्र आहेत.

२. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तिकिटावर तीन वेळा ते नगरसेवक राहिले आहेत.

३. महापौर पदी ही त्यांनी कार्यभार बघितला आहे.

४. संजोग वाघरे यांच्या पत्नी देखील नगरसेविका होत्या

५. स्थायी समितीच्या अध्यक्ष पदीही त्यांनी कार्यभार पहिला होता.

६. संजोग वाघेरे हे सलग ८ वर्षे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राहिले आहेत. (Ajit Pawar)

७. तसेच, शरद पवार आणि अजित पवार या दोघांचेही निकटवर्तीय म्हणून यांच्याकडे पहिले जाते.

Big News | ठाकरे-शिंदे भेटीबाबत ‘या’ बड्या नेत्याचा गौप्यस्फोट

Ajit Pawar | काय म्हणाले उद्धव ठाकरे… 

दरम्यान, आज मुंबईत ठाकरे यांच्या निवासस्थानी ‘मातोश्री’ येथे संजोग वाघेरे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला आहे. यावेळी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बोलताना म्हणाले की, “मला आता मावळमध्ये प्रचाराला यायचीदेखील गरज नाही, कारण आजच मावळमध्ये भगवा फडकला आहे. मला भेटल्यानंतर तुम्ही भावूक झाला, म्हणालात, मला भावूक व घाऊक यातील फरक कळायला लागलाय.(Ajit Pawar)

काहीजण भावूक आहेत, जे भावनेला महत्त्व देतात, ज्यांच्यात अजूनही संवेदना आहेत, आणि ते निष्ठेनं अजूनही भगव्यासोबतच आहेत. मात्र, काहीजण हे घाऊक आहेत, त्यांना आता खोक्यामध्ये बंद करायचंय आहे. पण तसं पाहिलं तर मावळ मतदारसंघ हा जेव्हापासून निर्माण झालाय, तेव्हापासून शिवसेना ही जिंकत आलेली आहे. जी सत्ता होती, ती आर पुन्हा येणारच, त्याबाबत कुठलेही दुमत नाही. पण आपली सत्ता त्यांनी हिसकावून घेतली, त्यांनी गद्दारी केलीय.”


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here