Press Conference | अजित पवार घेणार महत्त्वाची पत्रकार परिषद…. काय वळण घेणार महाराष्ट्राचा राजकारण?

0
36

Press Conference : जसजशी विधानसभा निवडणूक जवळ येत आहे तसतसा सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामधील संघर्ष वाढत चाललेला पाहायला मिळतोय. त्यातच राज्यात घडत असलेल्या घटनांमुळे सत्ताधारी पक्ष कोणते निर्णय घेतो यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. यातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्या संध्याकाळी पाच वाजता मुंबई येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. ही पत्रकार परिषद अचानकपणे बोलवण्यात आली असून, सूत्रानुसार या परिषदेत मोठी घोषणा केली जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

BJP President Resigns | भाजपला मोठा धक्का..!; बालेकिल्ल्यात जिल्हाध्यक्षांचा पक्षाला ‘राम राम’

आत्तापर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास पाहता पत्रकार परिषदा नेहमीच राजकीय वर्तुळात भूकंप आणणाऱ्या ठरल्या आहेत. त्याहूनही त्या जर अजित पवार घेत असतील तर नक्कीच काहीतरी मोठं होण्याची शक्यता असते. एमसीएच्या वानखेडे लॉंच येथे ही पत्रकार परिषद घेतली जाणार आहे.

2019 मध्ये देखील विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर जेव्हा शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्ता स्थापनेचा दावा करणार होते, त्याच दिवशी पहाटे अजित पवार यांनी भाजपसोबत शपथविधी उरकला होता. परंतु ते सरकार 36 तासांच्यावर टिकले नाही. एवढेच नव्हे तर वर्षभरापूर्वी अजित पवारांनी अचानकपणे महायुतीत जाण्याचा निर्णय घेतला ज्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली.

Badlapur Child Abuse | बदलापूर अत्याचार प्रकरणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ॲक्शन मोडवर

त्यानंतर, महायुतीचे सरकार स्थापन झाले. परंतु लोकसभा निवडणुकानंतर विधानसभेसाठी जागा वाटपाच्या मुद्द्यावरून पक्षांतर्गत खटके उडत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. ज्यामुळे महायुतीत सर्व काही अलबेल नसल्याच्या गोष्टी दिवसेंदिवस अधिक प्रकर्षाने दिसून येत आहेत. याचच उदाहरण म्हणजे भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून अजित पवारांना दाखवण्यात आलेले काळे झेंडे ही घटना ठरू शकते. एवढेच काय तर शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांच्यामध्ये कोकणातील कर्जत विधानसभेच्या जागेवरून शाब्दिक लढाया होत आहेत.

फडणवीसांचा नवाब मलिकांना विरोध

आमदार नवाब मलिक रविवारी अजित पवार यांनी मुंबई येथे आयोजित केलेल्या जनसन्मान यात्रेमध्ये सहभागी झाले होते. त्याचबरोबर त्यांनी अनुशक्ती नगर या आपल्या विधानसभा मतदारसंघात या यात्रेचे स्वागत करत कार्यक्रमास हजेरी लावली. एवढेच काय तर नबाब मलिक मंचावरही अजित पवार यांच्यासोबत एकत्र दिसले. कार्यक्रमाअंती नवाब मलिक आणि अजित पवार एकाच गाडीतून जाताना चित्रीत झाले. नवाब मलिक व अजित पवार यांच्यामध्ये झालेली ही भेट अनेक चर्चांना उधाण घेऊन येणारे ठरली.

राजकारणात अशा गाठीभेटी होतच असतात. कधी त्या उद्देशाने होतात तर, कधी फक्त आणि फक्त चर्चा निर्माण करण्यासाठी घडवून आणल्या जातात. त्यामुळे उद्या होणाऱ्या पत्रकार परिषदेचा नेमका उद्देश काय आहे? आणि पत्रकार परिषदेनंतर राज्याच्या राजकारणात कोणतं नवं वादळ येणार आहे, याचा अंदाज बांधता येणार नाही.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here