सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | तालुक्यातील सुभाषनगर येथे नवीन डीपी बसवून दोन महिने झाले असून, मात्र अद्यापही त्या डीपीवरून शेतकऱ्यांना वीज पुरवठा सुरु करण्यात न आल्याने वीज वितरण कंपनीच्या या भोंगळ कारभाराविषयी संबंधित शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. दोन दिवसात डीपीवरून वीज पुरवठा सुरु न झाल्यास उपोषण करण्याचा इशारा कांदा उत्पादक संघटनेचे जिल्हा समन्वयक भगवान जाधव यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांना मंगळवारी दि २० रोजी निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनाचा आशय असा की, देवळा तालुक्यातील सुभाषनगर येथे एप्रिल 2023 ला नवीन डीपी मंजुर झाली आहे. त्यावेळी संबंधित ठेकेदाराने डीपी बसविण्यासाठी फक्त खांब (सांगाडा) उभे करून ठेवले. यानंतर कालांतराने यावर डीपी बसवून आज आठ महिने झाले आहेत. मात्र तो अद्याप सुरू न झाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
याठिकाणी पावसाळी कांदा लागवडीचा हंगाम सुरू आहे. पाऊस बऱ्यापैकी झाल्याने विहिरींना पाणी उतरले असून, लागवड केलेल्या कांद्याला पाणी असून भरता येत नसल्याने ती रोपे करपू लागली आहेत.
Deola | दि देवळा मर्चंटस् को. ऑप. बँकेच्या नाशिक शाखेचे स्थलांतर व उद्घाटन सोहळा
यामुळे शेतकऱ्यांनी महावितरण कंपनीवर तीव्र संताप व्यक्त केली असून, येत्या दोन दिवसात डीपी वरून वीजपुरवठा सुरू न केल्यास डीपीखाली बसून उपोषण करण्यात येईल, असा इशारा निवेदनात राज्य कांदा उत्पादक संघटनेचे जिल्हा समन्वयक भगवान जाधव आदींसह केशव मगर, दत्तात्रेय नवले, प्रकाश जाधव, विनोद मगर, भूषण जाधव, रामदास मगर, बाळू जाधव, कुणाल जाधव, गोरख जाधव, सुभाष पवार, जगन जाधव, अनिल जाधव, किरण पगार, भास्कर पगार यांनी दिला आहे.
Deola | देवळ्यात वृक्षारोपणाचा अनोखा संदेश; वडिलांच्या रक्षा नदीत विसर्जित न करता वृक्षारोपण
सुभाष नगर ता. देवळा येथे नवीन डीपी बसविण्यासाठी संबंधित ठेकेदाराकडून गेल्या आठ महिन्यांपासून खांब रोवण्यात आले असताना मागणी केल्यानंतर डीपी बसविण्या आली. मात्र त्यातून वीज पुरवठा करण्यास हेतुपुरस्सर दुर्लक्ष करण्याचे काम सुरू आहे. यामुळेच संतप्त शेतकऱ्यांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे.
– भगवान जाधव (कांदा उत्पादक शेतकरी, सुभाष नगर (ता. देवळा)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम