Ajit Pawar : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची आणि नेत्यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली बैठक पार पडली असून या बैठकीत पक्षाच्या 54 आणि अपक्षांच्या 6 जागा धरून पुढे कामाला लागण्याचा सल्ला अजित पवारांनी दिला असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी दिली. या बैठकीनंतर काही दिवसांपूर्वी नागपूरमध्ये महायुतीची बैठक झाली होती. ज्यात जागावाटपाचा सर्वसाधारण फार्मूला काय असेल याची प्राथमिक स्तरावर चर्चा झाली होती. त्यावर आज राष्ट्रवादी पक्षाची बैठक पूर्ण झाली.
Ajit Pawar | ‘असेल हिम्मत तर समोर या’; जनसन्मान यात्रेच्या सभेत अजित पवारांचा विरोधकांवर हल्ला
“गणेशोत्सवानिमित्त काही काळ सन्मान यात्रा थांबवावी लागेल. त्याचबरोबर पक्षातील कार्यकर्त्यांना देखील काही कार्यक्रम दिले जातील. यावर देखील आज चर्चा झाली. मागच्या वेळी आपण 54 जागा जिंकल्या होत्या त्याच बरोबर जे अपक्ष आपल्या सोबत आहेत त्यांना धरून 60 चा आकडा आहे. त्यांना धरून तुम्ही पुढची वाटचाल करा.” असे अजित पवारांनी सांगितले आहे. तसेच आम्ही 60 जागा लढवणार ही बातमी चुकीची आहे, असे म्हणत तटकरेंनी अफवेचे खंडन केले.
Ajit Pawar | दादांनी जाहीर केलं काँग्रेसचे ‘हे’ आमदार फोडणार.?; नाशिकच्याही एकाचा समावेश?
Ajit Pawar | संजय लावताना लावला टोला
त्याशिवाय 2019 च्या लोकसभेत राष्ट्रवादीच्या चार जागा निवडून आल्या होत्या. शिवसेना आणि भाजप तेव्हा एकत्र लढले होते, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात त्यांना यशही मिळाले होते. त्यामुळे अर्थातच त्यांच्या विद्यमान जागा जास्त होत्या. आता विधानसभेत सुद्धा तेच असेल निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांना जागा वाटपात जास्त प्राधान्य दिले जाईल. असा निकष बैठकीत ठरवला आहे. तसेच, राजकोट प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी माफी मागूनही उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस नेते एकत्रित येऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या फोटोला जोडे मारतात, हे राजकीय दृष्ट्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला धरून नाही. संजय राऊत यांच्या डोक्यावरती परिणाम झाला असून ते चोरण्याची भाषा करीत असतात. त्यामुळे त्यांना गांभीर्याने घ्यावे इतके राजकीय महत्त्व त्यांना नाही. असं म्हणत संजय राऊतांना टोला लावला. (Ajit Pawar)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम