Ajit Pawar | दादांनी जाहीर केलं काँग्रेसचे ‘हे’ आमदार फोडणार.?; नाशिकच्याही एकाचा समावेश?

0
66
#image_title

Ajit Pawar : राज्यभर आगामी विधानसभा निवडणुकीन वातावरण रंगलेला आहे. सर्वच पक्ष अगदी कंबर कसून या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. तर दररोज कोणता ना कोणता नेता पक्षांतर करून दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहे. कालच देगलूरचे आमदार जितेश अंतापुरकरांनी काँग्रेसला हात जोडत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर काँग्रेसचे आणखीन तीन नेते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. याबाबत स्वतः अजित पवारांनी माहिती देत चक्क त्या नेत्यांची नावे जाहीर केली आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.

Congress MLA | नाशकात राजकीय घडामोडींना वेग; ‘हे’ आमदार शिंदे गटाच्या वाटेवर..?

Ajit Pawar | अजित पवारांनी केली नावे जाहीर

काल 30 ऑगस्ट रोजी मुंबई येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अजित पवार यांनी निवडणुकांसाठी आगामी रणनीती काय असेल याबाबत चर्चा केली. “येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला 60 जागांवर निवडणूक लढवायची तयारी करायची आहे सध्या आपल्याकडे 54 जागा असून ते आपण लढवणारच आहोत. परंतु इगतपुरी मतदार संघाचे काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर, अमरावतीच्या काँग्रेसच्या आमदार सुलभा खोडके व विधानसभा मतदारसंघाचे आमदार झिशान सिद्दीकी हे देखील यावेळी आपल्या सोबत येणार आहेत. तसेच त्यांच्यासोबतच करमाळ्याचे संजयमामा शिंदे, अपक्ष आमदार देवेंद्र भुयार हे देखील आपल्या सोबत असतील असा दावा करत लवकरच हे नेते आपल्या गटात पक्ष प्रवेश करतील. असे सांगितले त्यांच्या या वक्तव्यानंतर आता मात्र काँग्रेसची दाणादाण उडाली असून राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.

Congress MLA | नाशकात राजकीय घडामोडींना वेग; ‘हे’ आमदार शिंदे गटाच्या वाटेवर..?

निवडणुका गंभीरपणे घ्या-अजित पवार

या बैठकीमध्ये त्यांनी “आपल्याला ज्या महायुती मधून जागा मिळणार आहेत त्यांवरती अधिक लक्ष देऊन काम करा. इतर जागांवरती कमी काम केलं तरी काही हरकत नाही. ही निवडणूक गंभीरपणे घ्या. हलगर्जीपणा करू नका. डोळ्यात तेल घालून काम करा. आपल्याला लोकसभेच नरेटीव बदलायचा आहे. कोणतही वक्तव्य करण्याआधी माझ्याशी किंवा सुनील तटकरेंशी बोलून घ्या. असा सल्लादेखील त्यांनी यावेळी नेत्यांना दिला आहे. सध्या अजित पवार राज्यभर जलसन्मान यात्रेमध्ये व्यस्त असून त्यांची गुलाबी थीम चर्चेचा विषय ठरली.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here