सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे आज मंगळवारी दि. ३ रोजी देवळा बस स्थानकात शुकशुकाट दिसून आला. या संपाचा फटका शालेय विद्यार्थ्यांबरोबरच इतर चाकरमान्यांना बसला आहे. या संपाचा फायदा खाजगी वाहतूक दारांनी घेतला. जादा भाडे आकारून एक प्रकारे त्यांनी प्रवाशांची लूटमार केली आहे. एरवी देवळा बस स्थानक प्रवाशांनी गजबजलेले असते. आजच्या संपाने या बस स्थानकात शुकशुकाट दिसून आला. याचा फटका बाहेर गावी जाणाऱ्या प्रवाशांना व विद्यार्थ्यांना बसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली.
Deola | देवळ्यात तहसीलदार मिलिंद कुलकर्णींच्या अध्यक्षतेखाली अविश्वास प्रस्तावास संमती
Deola | एसटी कर्मचाऱ्यांच्या संपानं प्रवाशांची कोंडी
एसटी कामगारांच्या आर्थिक व महत्त्वाच्या प्रश्नांची सोडवणूक होत नसल्यामुळे अनेक कर्मचारी संघटनांनी एकत्र येत ३ सप्टेंबरपासून राज्यभरात आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे आजपासून बहुतांश सर्व आगारांत एसटी कर्मचाऱ्यांकडून महायुती सरकारविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे यासह अन्य मागण्यांबाबत शासन दरबारी अद्याप सकारात्मक निर्णय झाला नसल्याने कर्मचाऱ्यांकडून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. मात्र याने प्रवाशांची कोंडी झाली असून भुर्दंड सोसावा लागला.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम