Skip to content

Nashik | सावधान! नाशिक जिल्ह्यात १० हजारांवर एड्सबाधित


Nashik | जिल्ह्यात कोरोना महामारीनंतर एचआयव्हीचा व्हायरस हा विस्मृतीत गेला असला तरी, तो अजूनही पूर्णत: हद्दपार झालेला नाही. जिल्ह्यात त्याचा उपद्रव हा सुरूच आहे. जिल्ह्यात चालू वर्षात ऑक्टोबरपर्यंत एड्सचे नवीन ६३७ रुग्ण हे आढळून आलेले आहेत. सरासरी दररोज दोन नवीन रुग्णांना एचआयव्हीचा संसर्ग होत असून, गेल्या वर्षी देखील ६८२ नवीन एचआयव्ही बाधित हे आढळले होते. जिल्ह्यात सद्यस्थितीत १० हजार १७६ एड्स रुग्ण हे उपचार घेत असल्याची माहिती समोर आली आहे.

एक डिसेंबर हा ‘जागतिक एड्स दिन’ म्हणून पाळला जातो. ‘अॅक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम’ (एड्स) असे ह्या आजाराचे शास्त्रीय नाव आहे. दरम्यान, हा आजार किंवा रोग नाही. एचआयव्ही हे विषाणूने शरीरात शिरकाव केल्यास संबंधित व्यक्तीचे शरीर हे अन्य रोगांचे माहेरघर बनते. संबंधित व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती ही हळूहळू क्षीण होते.(Nashik)

Infotech news | अँन्ड्रॉईड च्या किंमतीत असा मिळवा iPhone 12

मानवी शरीरात ह्या विषाणूने प्रवेश केल्यानंतर सहा ते दहा वर्षांच्या कालावधीत कधीही त्या व्यक्तीला एड्स हा होऊ शकतो. करोनाकाळात आरोग्याबाबतची इतर आव्हाने वाढल्यामुळे एचआयव्ही निदान व चाचण्यांचे प्रमाण कमी झाले. पण, करोना निवळल्यानंतर एड्सच्या निदान चाचण्यांवर नव्याने लक्ष केंद्रित करण्यात आले होते. जिल्ह्यात गतवर्षी बाधित आढळण्याचा दर हा ०.३१ टक्के इतका होता. तो यंदा खाली उतरून ०.२८ टक्के इतका झाला आहे.

तरीही अनेकजण हे ह्या निदान चाचणीसाठी स्वत:हून पुढे येत नाहीत. त्यामुळे आपण एचआयव्ही बाधित आहोत, याची जाणीवच अनेक जणांना नसल्याने एड्सच्या प्रसाराचा धोका हा अधिक पटीने वाढला आहे. एचआयव्ही बाधितांपैकी किमान ९५ टक्के रुग्णांचे निदान करणे व त्यांना एआरटी उपचार घेण्याचे आव्हान हे आरोग्य यंत्रणेपुढे कायम आहे. त्यामुळे यापुढील काही काळात अतिजोखीम असलेले अन्य घटक शोधून त्यांचे एड्स निदान करवून घेण्याचे आव्हान हे आरोग्य यंत्रणेसमोर आहे.(Nashik)
Maratha reservation | मराठा-ओबीसी वादात अजित दादांची उडी; भुजबळांना समर्थन

वर्ष निदान चाचण्या बाधितांचा दर
२०२० – १,७५,७६२ ४८७ – ०.२७%
२०२१ – २,६६,०६४ ६१० – ०.२९%
२०२२ – २,२१,७६९ ६८२ – ०.३१%
२०२३ – २, ३१,५८२ ६३७ – ०.२८%(Nashik)

जिल्ह्यातील बाधितांचा तपशील
१. नाशिक शहर आणि जिल्हा – ७६५०
२. मालेगाव तालुका – २४४५
३. वसंतराव पवार मेडिकल कॉलेज – ८१
एकूण – १०,१७६

नाशिक जिल्ह्यात मागील १० महिन्यांत २ लाख ३२ हजार इतक्या एचआयव्ही निदान चाचण्या करण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये ६३७ जण हे बाधित आढळले आहेत. एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळण्याचा दर हा ०.२८ टक्के इतका असून, ९५ टक्के बाधित रुग्ण शोधण्याचे आव्हान अजूनही आमच्यापुढे आहे. त्यासाठी चाचण्याही वाढवणार आहोत.

योगेश परदेशी, जिल्हा एड्स अधिकारी


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!