Skip to content

Infotech news | अँन्ड्रॉईड च्या किंमतीत असा मिळवा iPhone 12


Infotech news |  आपल्याकडे बऱ्याच लोकांना आपले कंपनीचे फोन म्हणजेच आयफोन हे प्रचंड आवडतात पण, तो महाग असल्याने अनेक जण ह्या आयफोनच्या खरेदीसाठी ऑफरची वाट बघत असतात. तुम्हालाही हा आयफोन आवडत असेल आणि  स्वस्त तसेच तुमच्या बजेटमध्ये कमी किंमतीत तो खरेदी करायचा असेल तर, तुमच्यासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे. कारण आता अॅपल चा हा फोन तुम्हाला अगदी तुमच्या बजेट मध्ये आणि अगदी कमी किंमतीत मिळणार आहे.  iPhone 12 Mini हा अगदी कमी किंमतीत तुमच्या आणि तुमच्या खिशाला परवडेल अशा किंमतीत तुम्हाला तुमच्या घरी आणता येणार आहे. (iPhone 12 Mini)

Apple iPhone 12 Mini हा त्याच्या ६९,९०० रुपये ह्या त्याच्या सुरुवातीच्या किंमतीत लॉन्च करण्यात आलेला होता तसेच सध्या तो फ्लिपकार्ट ह्या ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर ४१,१५० रुपयांच्या सवलतीनंतर ९,८४९ रुपयांमध्ये तुम्हाला उपलब्ध होणार आहे. त्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या पद्धती वापरायच्या आहेत. (iPhone 12 Mini)

ह्या Apple iPhone 12 Mini ची किंमत ही सध्या Flipkart वर ८,९०१ रुपये इतक्या सवलतीनंतर ५०,९९९ रुपये इतकी आहे. याव्यतिरिक्त, ग्राहकांना बँक ऑफ बडोदाच्या क्रेडिट कार्ड ईएमआयवर २,००० रुपयांची सूट मिळणार आहे. ह्या भरघोस डिस्काउंटनंतर ह्या iPhone 12 Mini ची किंमत ही ४८,९९९ रुपये इतकी झाली आहे. (iPhone 12 Mini)

Maratha reservation | मराठा-ओबीसी वादात अजित दादांची उडी; भुजबळांना समर्थन

ह्या एक्सचेंज बोनसनंतर Apple iPhone 12 Mini ची किंमत ही ९,८४९ रुपयांपर्यंत खाली आलेली आहे. याचा अर्थ असा की सर्व बँक ऑफर व सवलतींसह, तुम्ही ४१,१५० रुपयांच्या सवलतीनंतर Apple iPhone 12 Mini हा फ्लिपकार्टवरून ९,८४९ रुपयांच्या सवलतीसह खरेदी करू शकणार आहात.

असे आहेत ह्या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स

ह्या स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाले तर, Apple iPhone 12 Mini ह्या स्मार्टफोनमध्ये ५.४ इंचचा डिस्प्ले आहे. यात १२-मेगापिक्सेलचे दोन कॅमेरे देण्यात आले आहेत, ज्याद्वारे वाइड अँगल फोटोदेखील काढता येणार आहे.  Apple कंपनीचा हा स्मार्टफोन शक्तिशाली A14 ह्या बायोनिक चिपसेटवर काम करतो. iPhone 12 Mini 5G कनेक्टिव्हिटी सपोर्टसह येतो. (iPhone 12 Mini)

AAI Recruitment | परीक्षा न देताच एअर इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!