Skip to content

Crime News | सजून धजून नवरी वरातीची वाट बघत होती; पण नवरा आत्तेबहिणीसोबत फरार


Crime News | बरेली | सध्या संपुर्ण भारतात लग्नाचा सिजन सुरु झालेला आहे. अशातच एक धक्कादायक घटना घडलेली आहे. बरेलीत एका घरात लग्नाचं वातावरण होतं, हळद, मेंहदी सगळं पार पडलं. रंगलेल्या मेहंदीच्या हाताने वधू, अधीर मनाने लग्नाची आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याची वाट बघत होती. लग्नाला अवघा एक दिवस उरलेला असताना तितक्यात घरी एक फोन आला, जे ऐकून वधूच्या पायाखालची जमीनच सरकली. नवरा मुलगा त्याच्या आत्तेबहिणीसोबत पळून गेला होता. उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यात हा सगळा विचित्र प्रकार घडला. (Crime News)

Infotech news | अँन्ड्रॉईड च्या किंमतीत असा मिळवा iPhone 12

वधूच्या कुटुंबियांना हा प्रकार समजताच सगळे नातेवाईक संतापले. संतापाच्या भरातच ते नवरदेवाच्या घरी पोहोचले आणि एकच गोंधळ माजला. त्यानंतर गावात पंचायत बोलवून अखेर दीड लाख रुपयांवर तोडगा काढवा लागला. सध्या पोलिसांनी पळून गेलेला तरुण आणि तरुणीला ताब्यात घेतले असून त्यांच्यावर अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करून त्यांच्याविरुद्ध चालान जारी केले आहे.

हे संपूर्ण प्रकरण भोजीपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेलं आहे. तेथील गावातील एका व्यक्तीने आरोप केला की, त्याच्या बहिणीचे लग्न शिशगढ पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावातील तरुणासोबत ठरलेले होते. लग्न अवघं एका दिवसावर आलेले होतं, दुसऱ्या दिवशी घरी वरात येणार होती. मात्र लग्नाच्या एक दिवसाआधीच होणारा नवरा त्याच्या आत्याच्या मुलीसोबत पळून गेला. ती आत्तेबहीण त्याच्याच गावात राहणारी होती. (Crime News)

ज्या मुलीचं लग्न ठरलं होतं, त्या वधूच्या घरच्यांनी त्यांच्या होणाऱ्या जावयाच्या घरी आधीच काही पैसे आणि बाईक दिलेली होती. लग्नाची सगळी खरेदीही झाली होती. नातेवाईकांसाठी जेवणाची व्यवस्था, मोठ्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले होते. पण लग्नापूर्वीच होणारा नवरा दुसऱ्या मुलीसोबत पळाल्याने सगळे नातेवाईक संतापले. चिडलेल्या मुलीच्या कुटुंबीयांनी मुलाचे घर गाठून तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.

Maratha reservation | मराठा-ओबीसी वादात अजित दादांची उडी; भुजबळांना समर्थन

पंचायतीनं काढला यावर तोडगा-

अखेर या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी गावात पंचायत बोलावण्यात आली होती. मुलीच्या बाजूचे जे पैसे खर्च करण्यात आले, त्यांना तो सर्व खर्च परत करण्यात यावा, असा तोडगा पंचायतीमध्ये काढण्यात आलेला आहे. सध्या पोलिसांनी त्या तरुण आणि तरुणीला ताब्यात घेतले असून किरकोळ कलमांतर्गत तरुणावर चालान लावलेले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नवरा मुलगा ज्या बहिणीसोबत पळून गेला, तिचा आधीच विवाह झालेला होता. मात्र पतीसोबत वाद झाल्यानंतर ती माहेरी येऊन राहत होती. ती बेपत्ता झाल्यावर तिच्या कुटुंबीयांनी भोजीपुरा पोलिसांत तक्रार केली होती. अखेर पोलिसांनी त्या दोघांना पकडलेले आहे. (Crime News)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!