Nashik | नाशकात एका सेवा निवृत्त लष्करी कर्मचाऱ्याची भररस्त्यात भोसकून हत्या

0
10
Latur Crime
Nashik Crime News

Nashik |  नाशिकमध्ये भररस्त्यात वाद व धुडगूस घालणाऱ्या मद्यपी तरुणांना लष्कर निवृत्त कर्मचाऱ्याने हटकले असता, संबंधित मद्यपी तरुणांनी कर्मचाऱ्याची भाेसकून हत्या केल्याची खळबळजनक घटना ही म्हसरुळ-आडगाव लिंक राेडवर साेमवार (दि. २७) रोजी रात्रीच्या सुमारास घडली.

शहरात सलग दुसऱ्या दिवशीही हत्येची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. तर, तीन दिवसांपूर्वीच शहर पाेलिस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारलेल्या संदीप कर्णिक यांना तरुण संशयितांनी गंभीर घटना घडवून सलामी दिल्याचेही बाेलले जात आहे. रवीदत्त राजेंद्र चाैबे (वय ४२) असे ह्या घटनेतील मृत व्यक्तीचे नाव आहे.

म्हसरुळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील म्हसरूळ आडगाव लिंक रोडवर रात्री सात ते साडे सात वाजेच्या सुमारास ही घटना घडली. घटनेनंतर म्हसरुळ पोलिसांनी याप्रकरणी दोन संशयित मारेकऱ्यांना ताब्यात घेतले आहे.

Milk Rate | नाशिक जिल्ह्यातील दूध उत्पादक संकटात; मागणी घटल्याने दर घसरले

रवी चौबे हे सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास सहकुटुंब कारने जात होते. त्यावेळी सुरती फरसाण ह्या कंपनीसमोर दोन तरुण मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घालत होते. त्यांनी आरडाओरड केला व वाहतूक अडवली. त्यामुळे चौबे यांनी त्या दोघांचा पाठलाग केला.

पण, त्यापैकी एकाने चौबे यांच्या छातीवर धारदार शस्त्राने वार केल्यामुळे चौबे हे गंभीर जखमी झाले होते. दरम्यान, म्हसरुळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चौबे यांना प्रथम खाजगी रुग्णालयात दाखल केले.

परंतु, त्यांना शासकिय रुग्णालयात घेऊन जात असतानाच त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी म्हसरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चौबे हे भारतीय लष्करातील सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. शहरातील एका शैक्षणिक संस्थेत ते सध्या वॉर्डन म्हणून कार्यरत हाेते, अशी माहिती समोर आली आहे.

Nashik | ‘भरपाई देताय तर सांगा, नाहीतर रामराम!’ बांधावर गेलेल्या भुसेंना शेतकऱ्याने सुनावलं

टाेळीचा सहभाग

दरम्यान, ह्या घटनेतील ताब्यात घेतलेल्या दाेन संशयितांसह त्यांचे साथीदार हे म्हसरूळ आडगाव लिंक रोडवरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांना अडवत पैशांची मागणी करत होते, अशी माहितीही पुढे आली आहे.

येथील सुरती फरसाण आणि जगन्नाथ लॉन्सजवळ संशयितांनी मद्याच्या नशेत अनेक वाहने अडवली होती तर, काही वाहनांच्या काचाही फोडल्यात. तर चालकांकडून खंडणीची मागणी करत त्यांना दमदाटीही केली.

यातील काही पीडित चालक हे संशयितांची गुंडागर्दी सुरु असल्याची तक्रार घेऊन म्हसरूळ पोलिस ठाण्यातही गेले हाेते. त्याचवेळी संशयितांनी चाैबे यांच्यावर हल्ला करत त्यांची  हत्या केली.

Court News | आरोपीला हजर करण्यास उशीर; कोर्टाने पोलिसांनाच सुनावली अजब शिक्षा


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here