Deola | दोषी औषध कंपनीवर कारवाई करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार – कृषीमंत्री कोकाटे

0
8
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | तालुक्यात तणनाशक फवारणीमुळे कांद्याच्या झालेल्या नुकसानीबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करून नुकसानग्रस्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज येथे दिली. शनिवारी दि. २५ रोजी सायंकाळी पाच वाजता कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचे देवळा शहरात आगमन होताच महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी पाच कंदील परिसरात त्यांचे फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोषात स्वागत केले. ना. कोकाटे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी कोकाटे यांचा सत्कार केला.

यावेळी पत्रकारांनी तालुक्यातील विठेवाडी पाठोपाठ मेशीसह परिसरात लागवड केलेल्या उन्हाळी कांद्यावर तणनाशकाची फवारणी केल्यानंतर शंभर एकर पेक्षा जास्त कांद्याचे संपूर्ण नुकसान झाले असल्याची विचारणा केल्यावर याबाबत अधिकाऱ्यांकडून माहीती घेऊन संबंधित औषध कंपनीवर कारवाई करण्याची व शेतकऱ्यांना त्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई मिळून देण्याचे यावेळी सांगितले. तसेच रासायनिक खतांच्या बरोबर येणारे लिंकिंग खते बंद करावेत अशा आशयाचे निवेदन तालुका शेतकरी सहकारी संघाच्या वतीने कृषिमंत्र्यांना देण्यात आले.

Deola | मेशी येथे तणनाशकामुळे १०० एकर कांद्याचे नुकसान; आ. आहेरांकडून पाहणी

यावेळी बाजार समितीचे सभापती योगश आहेर, नगरसेवक जितेंद्र आहेर, माजी संचालक जगदीश पवार, खाजगी कृषि मार्केटचे अध्यक्ष सुनील आहेर, नगरसेवक अशोक आहेर, भाजपचे तालुका अध्यक्ष अतुल पवार, नगरसेवक संतोष शिंदे, दिलीप पाटील, अतुल आहेर, अमोल आहेर, अनिल आहेर, मनोहर खैरणार, स्वप्नील आहेर, शिवसेना शिंदे गटाचे प्रतीक आहेर, भाऊसाहेब चव्हाण, ललिता निकम, किशोर आहेर, दत्तू आहेर, सतीश राणे, बापू गुंजाळ, शाम सूर्यवंशी, मनोज पवार, विनिद पाटील, हितेश आहेर, अविनाश सूर्यवंशी, विजय लुंकड, दीपक पवार, विजय पुरकर, रिंकू जाधव, मयूर सोनवणे, संभाजी शेजवळ आदी पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here