सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | येथील सुनिल आहेर खाजगी कृषी मार्केट येथे कांदा खरेदी करण्यासाठी नवनवीन पर्याय शोधले जात असून त्याअंतर्गत दुबई येथील नामवंत अशा लॅन जनरल ट्रेडिंग एल.एल.सी. या कंपनीने कांदा खरेदी करण्यासाठी या मार्केटची निवड केली आणि सदर कंपनीस तसा परवानाही देण्यात आला अशी माहिती या मार्केटचे अध्यक्ष सुनील आहेर यांनी दिली. कंपनीच्या माध्यमातून मार्केटात दैनंदिन कांदा खरेदी सुरू करण्यात येणार आहे.
सदर कंपनीचे भारत देशासह इतर ६९ देशांसोबत शेतमाल खरेदी विक्रीचे व्यवहार आहेत. दुबईस्थित एलएएन ग्रुपचे अध्यक्ष वाजिद अहमद व युनिहमा प्रायव्हेट लिमिटेड खरेदी विभाग प्रमुख कार्तिक स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली खरेदी विभागाचे संचालक सलमान कुरेशी यांच्याकडे येथील खरेदीचा कार्यभार राहणार आहे. रविवार (दि.२६) रोजी कुरेशी यांनी मार्केटला भेट देत येथील ध्वजवंदन केले. यावेळी मार्केटचे अध्यक्ष सुनील आहेर, संचालक ललित निकम, सचिन निकम आप्पासाहेब आहेर, शंतनू मोरे, सुशांत गुंजाळ, भूषण पवार, सतीश कचवे, गणेश देवरे, मनोहर पवार, प्रवीण शिंदे आदी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम