देवळा | मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या पिंपळगाव वा येथील जनता व उच्च माध्यमिक विद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली. ज्येष्ठ शिक्षिका मंगला आहेर, वैशाली निकम, प्रभारी पर्यवेक्षक अशोक खैरनार, सांस्कृतिक विभाग प्रमुख रवींद्र निकम, चंद्रशेखर चव्हाण, हेमंत पवार, रोहिणी आहेर यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. चंद्रशेखर चव्हाण यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे स्वराज्यासाठीचे योगदान व कार्य विशद केले. रवींद्र निकम यांनी प्रास्ताविक केले. सरोज जाधव यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम