सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | मकरंदवाडी (ता.देवळा) येथील श्रीक्षेत्र गोरक्षनाथ मळ्यात ३० जानेवारी ते ३ फेब्रुवारी २०२५ पर्यंत भव्य धर्मनाथ बीज महोत्सव आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती या संस्थानचे संचालक व प्रसिद्ध कीर्तनकार संजय धोंडगे यांनी बुधवार (दि. २९) रोजी दिली. या निमित्ताने श्रीकृष्ण चरितामृत कथा, हरिपाठ, कीर्तन सोहळा, बीजउत्सव आदी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. बीजउत्सवाचे हे ३१ वे वर्ष असून त्या निमित्ताने प्रसिध्द कीर्तनकार आपली सेवा रुजू करणार आहेत.
Deola | सुनिल आहेर खाजगी कृषी मार्केटमधून कांदा खरेदी करणार विदेशातील कंपनी
३०, ३१ जानेवारी व १ फेब्रुवारी असे तीन दिवस कथाव्यास श्रीगुरु चंद्रशेखर महाराज देगलूरकर हे रात्री आठ ते दहा या वेळेत श्रीकृष्ण चरितामृत कथा सांगणार असून ३१ जानेवारी रोजी धर्मनाथबीज उत्सवानिमित्त महेश महाराज वाढवनकर यांचे सकाळी १० ते १२ कीर्तन असणार आहे. २ फेब्रुवारी रोजी रात्री चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांचे तर ३ फेब्रुवारी रोजी बंडातात्या कराडकर यांच्या काल्याच्या किर्तनाने या उत्सवाची सांगता होणार आहे. तालविकास वारकरी गुरुकुल त्र्यंबकेश्वर चे विद्यार्थी किर्तनसाथ करणार आहेत. येणाऱ्या भाविकांची राहण्याची व भोजनाची सोय केलेली असल्याने या कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम