देवळा | देवळा शहरात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने भव्य हळदीकुंकू सोहळा संपन्न झाला. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहर अध्यक्षा वनिता संतोष शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला. यावेळी उपस्थित महिलांना वानरुपी गोडवा वाटण्यात आला. या कार्यक्रमाचा महिलांनी फुगे फोडणे, बुद्धिमत्ता चाचणी, ऐनवेळी आलेल्या विषयावर बोलणे आदी विविध प्रकारचे खेळ खेळून आनंद लुटला. यावेळी वर्षा आहेर, सरिता आहेर, उज्ज्वला खैर, उज्ज्वला सावकार, राणी निकम, बच्छाव बाई, सोनवणे बाई, भामरे ताई आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आभार वनिता शिंदे यांनी मानले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम