Deola | खर्डे येथे दत्त जयंती निमित्त शनिवार पासून अखंड हरिनाम सप्ताह

0
26
#image_title

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | श्री. गुरुदेव दत्त मंदिर ट्रस्ट, खर्डे, येथे ब्रहाविलीन श्री. संत केरोबा महाराज यांचे चरणदास ब्रह्मविलीन वैकुंठवासी श्री. संत वामनानंद महाराज यांच्या कृपाशिर्वादाने व त्यांचे उत्तराधिकारी ह.भ.प. पुंडलिक महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार दि. ७ पासून दत्त जयंतीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

Deola | देवळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट, घरफोड्यांचे प्रमाण वाढले; पोलीस गस्त वाढवण्याची मागणी

सप्ताहातील दैनिक कार्यक्रम पुढीलप्रमाणे:

नित्य पुजाअर्चा ह.भ.प. पुंडलिक महाराज, प्रातःकाळी ५ ते ८ श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण, सकाळी ८ ते ९ विष्णू सहस्त्रनाम व गीतापाठ, सकाळी ९ ते ११ ह.भ.प. नामदेव महाराज घोटीकर सुश्राव्य तुळशीदास रामायण, दुपारी ४ ते ५ ज्ञानेश्वरी प्रवचन होईल. सायं. ५ ते ६ हरीपाठ, रात्री ९ ते ११ हरीकिर्तन होईल. गायनाचार्य गणेश महाराज आळंदी, सोपान महाराज खैरनार, वडाळीभोई तर शनिवार दि.७ रोजी ह.भ.प. तानाजी महाराज जगताप, खर्डे याचे प्रवचन, ह भ प लक्ष्मण महाराज, कनकापूर याचे कीर्तन, रविवार ८ रोजी ह.भ.प. काशिनाथ महाराज, कनकापूर यांचे प्रवचन, ह.भ.प. चांगदेव महाराज, आळंदी यांचे कीर्तन.

Deola | देवळ्यात बेकायदा गॅस रिफिलींगवर पोलीसांचा छापा; १३६ सिलेंडर, ०२ चारचाक्या व गॅस रिफिलिंगची सामुग्री जप्त

आयोजकांकडून खर्डे व परिसरातील भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन

सोमवार ९ दि. रोजी ह. भ. प. सूर्यवंशी सर, लासलगाव यांचे प्रवचन, ह.भ.प. भगवान महाराज, राहुरी यांचे कीर्तन, मंगळवार दि. १० रोजी ह.भ.प. मधुकर महाराज गांगुर्डे, लासलगाव यांचे प्रवचन, ह.भ.प. एकनाथ महाराज गोळेसर, सिन्नर यांचे कीर्तन, बुधवार दि. ११ रोजी ह.भ.प. रमेश महाराज, आळंदी यांचे प्रवचन, ह.भ.प . राहुल महाराज क्षीरसागर, पिंपळगाव यांचे कीर्तन, गुरुवार दि. १२ रोजी ह.भ.प. शिवाजी महाराज, भडाने यांचे प्रवचन, ह.भ.प. भगवान महाराज, कचरे यांचे कीर्तन, शुक्रवार दि.१३ रोजी ह.भ.प. कदम महाराज, चांदवड यांचे प्रवचन, ह.भ.प. चिदंबर महाराज साखरे, आळंदी यांचे कीर्तन, शनिवार दि. ४ रोजी सकाळी गावातून पालखी सोहळ्याची मिरवणूक व ह.भ.प. पुंडलिक महाराज खर्डे, यांचे सकाळी १० वाजता काल्याचे कीर्तन होऊन महाप्रसादाने सप्ताहाची सांगता होईल. या कार्यक्रमाचा खर्डे व परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here